Shani Margi 2023: ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायाची देवता म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फलप्रदान करतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रात शनीला विशेष स्थान आहे. शनि हा कर्माचा दाता आणि न्यायप्रिय ग्रह मानला जातो. शनी खूप हळू चालतो. यामुळेच शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे घालवतो. यावेळी शनी मूळ त्रिकोणी कुंभ राशीत आहे. ३० वर्षांनंतर शनीचे कुंभ राशीत भ्रमण होत आहे. कुंभ राशीत प्रतिगामी राहिल्यानंतर ४ नोव्हेंबर २०२३ शनी मार्गी होतील. शनीच्या थेट हालचालीमुळे मोठे बदल घडतील. याचा प्रभाव काही राशींच्या लोकांच्या जीवनावर पडून त्यांचे भाग्योदय चमकून उठण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या राशी…
‘या’ राशींवर शनिदेवाची कृपा?
वृषभ
शनीच्या हालचालीमुळे वृषभ राशीच्या लोकांचा याकाळात आत्मविश्वास वाढू शकतो. या लोकांना प्रत्येक कामात यश मिळू शकतो. या लोकांना व्यवसायात खूप फायदा होण्याची शक्यता आहे. मोठा धनलाभ होऊ शकतो. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात तुमचा आनंद कायम राहू शकतो.
(हे ही वाचा : आठ दिवस शुक्रदेव सिंह राशीत राहून ‘या’ राशींना देणार गडगंज पैसा? तिजोरीवर राहू शकते माता लक्ष्मीची कृपा )
कर्क
शनि मार्गी कर्क राशीच्या लोकांच्या जीवनाची शुभ सुरुवात करु शकते. करिअरमध्ये प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या मेहनतीला यश मिळू शकतो. नोकरदारांना मोठी वेतनवाढ मिळू शकते. या काळात आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते.
कन्या
शनीच्या मार्गाने कन्या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. व्यावसायिक जीवन खूप चांगले राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो. यावेळी राजकारणाशी संबंधित असलेल्यांच्या आयुष्यात यशाचा काळ सुरू होऊ शकतो. समाजात मान-सन्मान वाढू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)