ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं विशेष महत्त्व आहे. शनिदेव न्यायदेवतेची भूमिका बजावतात आणि जातकांना आपल्या कर्मानुसार ते फळं देतात, असं म्हटलं जाते. ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा अस्त आणि मार्गी अवस्था अत्यंत महत्त्वाची असल्याचं मानलं जातं. जेव्हा एखादा ग्रह मार्गी अवस्थेत जातो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. आता २९ ऑक्टोबर २०२३ रोजी शनिदेव थेट कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. जेव्हा शनीदेव मार्गी होतील तेव्हा काही राशींच्या लोकांवर त्याचा विशेष शुभ प्रभाव दिसून येऊ शकतो. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींचे भाग्य उजळणार?
मिथुन राशी
मिथुन राशींच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना या काळात वाहन आणि मालमत्ता मिळू शकते. तसेच, नोकरदार लोकांसाठी हा काळ भाग्यवान सिद्ध होऊ शकतो. दुसरीकडे, नोकरदार लोकांना बढती आणि वेतनवाढही मिळू शकते.
सिंह राशी
कुंभ राशीत शनिदेवाचे थेट भ्रमण असल्यामुळे या राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. उत्पन्नात वाढ होऊ शकते. या काळात या राशीतील लोकांना घर किंवा वाहन मिळण्याचीही शक्यता आहे. प्रेम प्रकरणात यश मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या बातम्या मिळू शकतात.
(हे ही वाचा : येत्या दोन दिवसात त्रिग्रही योग बनल्याने ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? सूर्य-बुध-मंगळदेवाच्या कृपने वाढू शकतो बँक बॅलन्स )
तूळ राशी
शनिदेवाचे मार्गी होणे तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. नोकरी आणि बिझनेस दोन्हीसाठी वेळ चांगला राहू शकतो. नोकरदार लोकांना पदोन्नतीचा लाभ मिळू शकतो. कामात यश मिळू शकतो. करिअरमध्येही मोठी झेप घेण्यासाठी वेळ अनुकूल ठरु शकते.
मकर राशी
२९ ऑक्टोबरनंतर शनिदेवाच्या कृपेने या राशीतील लोकांना अच्छे दिन अनुभवता येऊ शकतात. तुमच्या राशीच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. सध्याच्या नोकरीत तुम्हाला परदेशात जावे लागू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये मोठी झेप घेण्यासाठी वेळ अनुकूल ठरु शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)