Shani Margi In Kumbh: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला महत्त्वाचा ग्रह मानण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्म, न्याय आणि धर्माचं कारक मानलं जातं. शनिदेव एका राशीत अडीच वर्ष विराजमान असतात. सध्या शनिदेव कुंभ राशीत असून ते वक्री आहेत. शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी शनिदेव प्रत्यक्ष मार्गी होणार आहेत. शनिदेव १४० दिवसानंतर कुंभ राशीत पुन्हा मार्गी होऊन आणि सरळ चाल करू लागतील. या शनिदेवाच्या थेट हालचालीमुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या’ राशींना होणार धनलाभ?

तूळ राशी

ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कुंभ राशीत मार्गी होणार असून या राशीच्या पाचव्या भावात विराजमान होणार आहेत. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना वर्ष २०२४ पर्यंत सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. या राशीतील लोकांचे परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. संपत्ती आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणेही मार्गी लागू शकतात. व्यवसायाशी संबंधित लोकांना भरपूर नफा मिळू शकतो. या राशीतील लोकांना सरकारी ऑर्डर देखील मिळू शकते.

(हे ही वाचा : ३६५ दिवसांनी मंगळ-सूर्यदेवाची वृश्चिक राशीत युती; ‘या’ ३ राशी होतील श्रीमंत? लक्ष्मीच्या कृपेने घरात येऊ शकतो पैसा )

धनु राशी

या राशीच्या तिसऱ्या घरात शनिदेव विराजमान राहणार आहेत. त्यामुळे या राशीतील लोकांची व्यवसायात खूप प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला सर्वत्र यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात या राशीचे लोकं एखादे मोठे वाहन खरेदी करू शकतात. या राशीतील लोकांचे उत्पन्न वाढून आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.

मकर राशी

शनिदेव या राशीच्या दुसऱ्या भावात विराजमान राहणार असून या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात या राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. घरात एखादे धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. व्यवसायात लक्षणीय यश मिळू शकतो. कुटुंबामधून सुखद वार्ता मिळू शकतात. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)