पुढील महिना म्हणजेच नोव्हेंबर २०२३ हा महिना ज्योतिष शास्त्रानुसार खूप महत्त्वाचा आहे. नोव्हेंबरमध्ये, शनि, राहू-केतू आणि शुक्र यांसारख्या महत्त्वाच्या ग्रहांचा सर्व १२ राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल. ३० ऑक्टोबरला राहु-केतू ग्रहांचे भ्रमण होत आहे. यानंतर भौतिक सुखांचा कारक मानला जाणाऱ्या शुक्राच्या गोचराने नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होत आहे आणि त्यातच ४ नोव्हेंबरला शनिदेव मार्गी होणार आहेत. यावेळी शनि प्रतिगामी अवस्थेत भ्रमण करत आहे. या महत्त्वाच्या ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व लोकांवर होईल. पण चार राशी आहेत ज्यांच्यासाठी हे भ्रमण खूप शुभदायी ठरु शकते. या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोव्हेंबर महिन्यात ‘या’ राशींची दिवाळी होणार गोड?

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना बंपर फायदा घेऊन येणारा ठरु शकतो. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख, संपत्ती आणि समृद्धीची शक्यता निर्माण होत आहे. या काळात तुम्हाला कोणत्याही कामात चांगले यश मिळू शकते. तसेच व्यवसाय आणि नोकरीत चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

(हे ही वाचा : नवरात्रीत तूळ राशीत चार ग्रहांची युती; ‘चतुर्ग्रही योग’ बनल्याने ‘या’ राशींचे सुरु होणार अच्छे दिन? मिळू शकते अमाप संपत्ती )

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना लाभदायी ठरू शकतो. या काळात तुम्हाला नवीन काम सुरू करता येऊ शकते. कामात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. यासह नोकरदारांना वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. यावेळी तुमच्या उत्पन्नाचे अधिक स्रोत निर्माण होऊ शकतात.

कन्या राशी

कन्या राशींच्या मंडळीसाठी नोव्हेंबर महिना भरपूर धनलाभ देणारा ठरु शकतो. दिवाळीत चांगला बोनस मिळण्याची शक्यता आहे. मानसन्मान मिळण्याची शक्यता असून या काळात कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळू शकते. तसेच प्रेमसंबंधात स्नेह वाढू शकतो.

(हे ही वाचा : ३० वर्षानंतर नवरात्रीला शुभ राजयोग घडल्याने ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ? शनिदेवाच्या कृपेने मिळू शकते अमाप संपत्ती )

कुंभ राशी

नोव्हेंबर महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ देणारा ठरु शकतो. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता असून घरात नवीन वाहन येण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani margi shukra gochar 2023 these four zodic signs bank balance to raise money marathi astrology pdb