Saturn Margi Effects on Zodiac Signs 2023-2024 in Marathi: शनीदेव हे ज्योतिषशास्त्रात न्याय देवता म्हणून ओळखले जातात. पण म्हणूनच शनीचा प्रभाव हा नकारात्मकच असणार असाही गैरसमज होतो. पण मुळात शनीदेव हे न्यायासह कर्मदेवता सुद्धा आहेत. म्हणजेच उत्तम कर्म केल्यास त्याचा लाभ सुद्धा शनिदेव मोठ्या प्रमाणात मिळवून देऊ शकतात. अशाच काही भाग्यवान राशींसाठी जून २०२४ पर्यंतचा कालावधी हा प्रचंड भरभराटीचा असणार आहे असे समजतेय. शनीदेव कुंभ राशीत सध्या उलट चाल म्हणजेच वक्री झालेले आहेत तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शनी सरळ मार्गी होणार आहेत.

ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, यानंतर ३० जून २०२४ ला शनी मार्गी होणार आहेत, त्यामुळे तोपर्यंत १२ राशींवर शनीची थेट दृष्टी पडणार आहे. यात सगळ्याच राशींच्या भाग्यात काही कमी-अधिक प्रमाणात बदल दिसून येतील पण तीन अशा राशी आहेत, ज्यांना खरोखरच कोट्याधीश व्हायची संधी आहे. वेगवेगळ्या मार्गांनी त्यांच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते.

Marathwada is a leader in drone technology
ड्रोन तंत्रज्ञानात मराठवाडा अग्रेसर
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Oli Price Hike
Edible Oil : ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल महागणार, आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ
Shukra Nakshatra Gochar 2024
१३ सप्टेंबरपासून पालटणार ‘या’ तीन राशीधारकांचे नशीब, शुक्र नक्षत्रामुळे अपार धनलाभ
Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारला, पण पैसे कधी येणार? सप्टेंबरमध्ये अर्ज भरल्यावर किती पैसे मिळणार? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे!
Loksatta bookmark My Father Brain A Life in the Shadow of Alzheimer Sandeep Johar
बुकमार्क: विस्मृतीच्या अंधारातील धडपड…
retirement planning, financial freedom, emotional aspects, senior financial planning, peace of mind, financial mentor, heritage, family values, mental preparation,
निवृत्तीच्या उंबरठ्यावरचं अर्थकारण!
mhada Reduce Consent Requirement of building owner for Group Redevelopment
समूह पुनर्विकासात इमारत मालकांच्या १०० टक्के संमतीला म्हाडाकडून आक्षेप, साडेआठशे इमारतींचा पुनर्विकास दृष्टिपथात!

जून २०२४ पर्यंत शनीचा ‘या’ ३ राशींवर असणार शनीची थेट दृष्टी

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

शनीदेव कुंभ राशीत मार्गी झाल्याने वृषभ राशीसाठी अत्यंत शुभ काळ सुरु होणार आहे. नोकरीत जो बदल तुम्हाला हवाहवासा होता पण करायला भीती वाटत होती तोच बदल तुमच्यासाठी अपार श्रीमंती घेऊन येऊ शकतो. आर्थिक मिळकत तिप्पटीने वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याची हेळसांड टाळावी. विनाकारण एखाद्याला सल्ला देणे टाळावे कारण यामुळे समोरच्याचा गैरसमज होण्याची जास्त शक्यता आहे. वैवाहिक जीवनात प्रेम टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागू शकते. शेअर बाजार किंवा व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी शुभ कालावधी आहे. निर्णय घेतानाचा वेग वाढवावा लागेल पण तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला विसरू नका.

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

२०२३ च्या सुरुवातीलाच मिथुन राशीला शनीच्या साडेसातीतून मुक्ती मिळाली आहे. त्यात आता येत्या काळात शनीची थेट दृष्टी जरी पडणार असली तरी तुमचा लाभ होण्याची चिन्हे आहेत. मार्गी झालेले शनी तुम्हाला धनी बनवून जाऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित लोकांची मदत मिळू शकते. कोर्टाचे निकाल तुमच्या बाजूने लागू शकतात. ज्यामार्गातून तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची चिन्हे आहेत. चांगल्या नोकरीच्या संधी चालून येऊ शकतात. तुम्हाला स्थैर्य व नवीन प्रयत्न यामध्ये निवड करावी लागू शकते. तुमचा समाजातील मान- सन्मान वाढवेल अशी एखादी घटना घडू शकते. तुमच्या आई वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या तसेच स्वतःच्या पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

हे ही वाचा<< २२ दिवसांनी बुधादित्य राजयोग बनल्याने ‘या’ ५ राशींच्या दारी येईल लक्ष्मी? प्रत्येक नात्यात येईल सूर्यासारखी चमक

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

तूळ राशीला शनीचा आशीर्वाद विविध रूपातून दिसून येईल. तुमच्या कष्टांचे चीज होणार आहे. कामाच्या ठिकाणी जर पुढाकार घेऊन काम केलं तरच तुम्हाला लाभ होऊ शकतो अन्यथा तुम्हाला इतरांच्या सांगण्यानुसार वागावे लागू शकते. ज्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. कौटुंबिक एकोपा वाढेल. काही वेळा तुम्हाला जबाबदाऱ्या व अपेक्षांचे ओझे जाणवू शकते. अनेक गोष्टी एकाच वेळी अंगावर येऊ शकतात पण तुम्हाला यातून मार्ग काढल्यास आनंद, सुख व धनप्राप्ती होऊ शकते. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुम्हाला सोने- चांदीमध्ये गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)