Mangal shani shadashtak yog 2024: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा सेनापती असलेल्या मंगळ ग्रहाला खूप खास मानले जाते. इतर ग्रहांप्रमाणे मंगळदेखील निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळेल. तसेच शनी देखील अडीच वर्षातून एकदा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ सध्या कर्क राशीमध्ये विराजमान असून शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशी असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहे. शनी आणि मंगळ एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या घरात उपस्थित आहेत. ज्यामुळे षडाष्टक योग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये हा राजयोग खूप खास मानला जातो. या योगाच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना शुभ प्रभाव पाहायला मिळेल.

मंगळ-शनी करणार मालामाल

मेष

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ketu Gochar 2024
Ketu Gochar 2024 : केतु ग्रहाने केला सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार अचानक पैसाच पैसा!
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
Mangal rashi parivartan 2024
मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या लोकांना पुढील १३८ दिवस होणार आकस्मिक धनलाभ

मेष राशीच्या व्यक्तींसाठी षडाष्टक राजयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. वैवाहिक जीवन सुखमय राहिल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा षडाष्टक राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला विशेष लाभ पाहायला मिळेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. घरात सुख, शांती नांदेल. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. आरोग्य चांगले राहिल.

हेही वाचा: नुसता पैसा; मंगळाच्या जबरदस्त प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रमोशन आणि धनसंपत्तीचे सुख

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींना षडाष्टक राजयोगामुळे सकारात्मक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल.

(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)