Shani Meen Rashi Parivartan 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला कर्म फळदाता आणि न्यायाचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. शनी नवग्रहातील ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी शनीला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. शनीने जानेवारी २०२३ मध्ये कुंभ राशीमध्ये प्रवेश केला होता आणि अडीच वर्ष तो याच राशीमध्ये राहील. २९ मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने काही राशीच्या व्यक्तींना चांगले परिणाम पाहायला मिळतील. हे राशी परिवर्तन त्यांच्यासाठी खूप खास असेल. पंचांगानुसार, २९ मार्च २०२५ रोजी शनी मीन राशीत प्रवेश करणार असून ते ३ जून २०२७ पर्यंत या राशीत राहणार आहे.
या तीन राशी होणार मालामाल
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींना शनीच्या राशी परिवर्तनामुळे अनेक चांगले फायदे होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल.
वृश्चिक
शनीचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल.
हेही वाचा: पैसाच पैसा! बुधाच्या अनुराधा नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
मकर
मकर राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनीचे राशी परिवर्तन खूप खास असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)