Shani Nakshatra Gochar 2025 : ज्योतिष शास्त्र की गणना के मुताबिक, अक्षय्य तृतीया से पहले 28 अप्रैल को शनि नक्षत्र परिवर्तन करने जा रहे हैं. इसका प्रभाव 12 राशियों पर पड़ने वाला है.
यंदा अक्षय तृतीया २९ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी शुभ कार्याची सुरूवात केली जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेपूर्वी २८ एप्रिल रोजी शनि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. जसे शनि नक्षत्र परिवर्तन करणार, तसे चार राशींच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते. कारण उत्तराभाद्रपद नक्षत्र हा शनिचा नक्षत्र आहे. या नक्षत्रात प्रवेश करताच शनिदेवाला बळ मिळेल आणि त्यामुळे ते नुकसान देऊ शकतात
कर्क राशी ( Cancer Zodiac)
कर्क राशीवर शनिच्या नक्षत्र गोचरचा अत्यंत वाईट प्रभाव पडणार आहे. शनिच्या नक्षत्र गोचरमुळे कर्क राशीच्या लोकांना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. गैरसमज वाढू शकात. गुंतवणूक करण्यापासून या लोकांना स्वत:ला दूर ठेवावे. कोणावरही विश्वास ठेवू नये. या लोकांनी अत्यंत हुशारीने व सतर्कतेने वागणे गरजेचे आहे.
सिंह राशी (Leo Zodiac)
सिंह राशीच्या लोकांना अपत्य संबंधिक समस्या दिसून येईल. जे लोक शिक्षण घेत आहे किंवा सरकारी नोकरीसाठी परीक्षेची तयारी करत आहे, त्यांच्या एकाग्रतेत अडथळे निर्माण होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी जास्त अडचणी येऊ शकतात. आर्थिक नुकसान होऊ शकते.
वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)
वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या कुटुंबातील लोकांची काळजी घ्यावी लागेल. या दरम्यान त्यांना एकटे वाटू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा कायदेशीर प्रकरणात अडकू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागेल.
धनु राशी (Sagittarius Zodiac)
धनु राशीच्या लोकांना या दरम्यान कोणत्याही प्रकारची घाई करू नये. घरी चोरी होण्याची शक्यता आहे. आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. नोकरीमध्ये कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांमध्ये वादविवाद होऊ शकतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)