Shani Nakshatra Parivartan 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशींसह नक्षत्रेही बदलत असतात, ज्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम मानवी जीवनावर होत असतो. त्यात कर्मदाता, न्यायाधीश वा दंडाधिकारी असलेला शनी देव २७ डिसेंबर २०२४ रोजी शतभिषा नक्षत्रातून पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनीच्या नक्षत्रबदलाने काही राशींचे नशीब चमकू शकते. करिअर आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. नेमक्या कोणत्या राशींना शनीच्या नक्षत्रबदलाचा फायदा होईल ते जाणून घेऊ…
शनीच्या नक्षत्र बदलाने ‘या’ राशी होणार श्रीमंत? मिळणार प्रचंड धन अन् सुख
v
मकर
शनी देवाचा नक्षत्रबदल मकर राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमचे रखडलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी हा काळ नवीन टेंडर आणि परदेशी करारांसाठी अनुकूल आहे. नोकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. पदोन्नतीची शक्यता आहे. तसेच या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तसेच यावेळी तुमच्या लव्ह पार्टनरबरोबर वेळ घालवल्याने तुमचे नाते अधिक घट्ट होईल.
मिथुन
शनी देवाने केलेला नक्षत्रबदल मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ लाभेल. तसेच, तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करतील. सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. तुम्हाला देश-विदेशांत प्रवासाची संधी चालून येऊ शकते. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तसेच तुमचे रखडलेले काम यावेळी पूर्ण होऊ शकते.
कुंभ
शनी देवाचा नक्षत्रबदल कुंभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमची कार्यशैली सुधारेल. तसेच तुमचा आत्मविश्वासही वाढेल. नवीन मालमत्ता खरेदी किंवा गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ चाललेले आर्थिक वाद संपतील. तुमची नेतृत्व क्षमता आणि निर्णय क्षमता वाढेल. तसेच, विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान असेल. या काळात अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.