Shani Nakshatra Parivartan 2025: न्याय देवता शनिला सर्वात कठोर ग्रह मानले जाते. कारण हा ग्रह व्यक्तीला कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे शनि राजाला गरीब आणि गरीबाला राजा सुद्धा बनवू शकतो. शनि प्रत्येक अडीच वर्षानंतर राशी परिवर्तन करतो आणि दरवर्षी एक नक्षत्र बदलतो. तसेच ३० वर्षातून परत त्याच राशीमध्ये आणि जवळपास २७ वर्षांनी परत त्याच नक्षत्रामध्ये प्रवेश करतो ज्याचा परिणाम सर्व बारा राशींवर दिसून येतो.
सध्या शनि कुंभ राशी आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये स्थित आहे पण २८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी ते उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि मीन राशीमध्ये गोचर करणार आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल पण तीन राशींच्या लोकांसाठी हे गोचर अत्यंत शुभ ठरणार आहे.
तुळ राशी
शनिचा गोचर तुळ राशीच्या लोकांच्या सहाव्या भावात असणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हा खूप मोठा लाभ ठरू शकतो अडकलेले काम पूर्ण होऊ शकतात आणि करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकतात. कामाच्या ठिकाणी या लोकांच्या कामाचे कौतुक केले जाईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका होईल. जीवनात सुख शांती दिसून येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. कुटुंबात संपत्ती किंवा वाद मिटू शकतात.
वृषभ राशी
शनिचा गोचर वृषभ राशीच्या अकराव्या भावात विराजमान आहे जो धन आणि यश सुचित करतो. या गोचरमुळे या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो आणि समाजात मान सन्मान वाढणार. सामाजिक गाठीभेटी वाढतील. करिअरमध्ये प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. कुटुंब आणि मित्रांबरोबर चांगले संबंध निर्माण होईल. आरोग्य उत्तम राहीन. खाण्या-पिण्याच्या सवयीकडे लक्ष द्यावे
कर्क राशी
शनिचा हा गोचर कर्क राशीच्या नवव्या भावात असेल जो भाग्य आणि प्रगतीशी संबंधित आहे. या दरम्यान जुन्या समस्या समाप्त होऊ शकतात आणि उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. धैर्याने काम केल्यावर प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. आई वडिलांचे सहकार्य मिळू शकते ज्यामुळे तो आपल्या लक्ष्य प्राप्त करू शकतात. दांपत्य जीवनातील तणाव कमी होईल. आरोग्य चांगले राहीन आणि जीवनात आनंद दिसून येईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)