Shani Nakshatra Parivartan 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनीदेवाच्या राशीपरिवर्तनामुळे, नक्षत्रपरिवर्तनामुळे किंवा हालचालींमुळे राशींवर अनेक अनुकूल-प्रतिकूल परिणाम दिसून येतात. सध्या कर्म फळदाता शनी मीन राशीत विराजमान आहे. तर, लवकरच शनीचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे. सध्या शनी पूर्वाभाद्रपद नक्षत्रात आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, २८ एप्रिल रोजी शनी उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनि उत्तराभाद्रपदा नक्षत्रात ३ ऑक्टोबरपर्यंत राहतील.  शनिच्या या नक्षत्र परिवर्तनाने काही राशींच्या व्यक्तींना धन-संपत्ती आणि सुख लाभण्याची शक्यता आहे, पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

शनीच्या नक्षत्र गोचरमुळे ‘या’ राशींना होणार मोठा धनलाभ?

मेष

शनीचं उत्तराभाद्रपद नक्षत्रातील संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरु शकते. करिअर किंवा व्यवसायात तुम्ही प्रगती करणार असून पुढे जाण्याची तुम्हाला संधी मिळू शकते. परदेशातून नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. यावेळी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.

सिंह

शनीचं नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी खूपच फायदेशीर ठरु शकते. तुमच्यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. विवाहइच्छुकांच्या आयुष्यात मनाजोगा जोडीदार येऊ शकतो. तुम्हाला वैवाहिक आयुष्यात सुख लाभू शकतो. शनिदेवाच्या कृपेने या काळात काम, पैसे, प्रसिद्धी सगळं तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. 

तूळ

शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने तूळ राशीच्या मंडळींना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार असून बँक बॅलेन्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते. घरात एखादं धार्मिक कार्य सोहळा होऊ शकतो. व्यवसायात लक्षणीय यश प्राप्त होऊ शकतो.

धनू

शनिदेवांचे नक्षत्र परिवर्तन धनू राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन येऊ शकतात. जना पुन्हा सुरू होऊ शकतात. या काळात नवीन नोकरीची ऑफर किंवा पदोन्नती तुम्हाला आनंद देऊ शकते. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ आता मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसा मिळू शकतो.

मकर

शनिदेवांचे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरु शकते. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. अडकलेले पैसेदेखील मिळण्याची शक्यता आहे. या लोकांचं उत्पन्न वाढून आर्थिक स्थिती बळकट होण्याची शक्यता आहे. कुटुंबामधून एखादी आनंदाची बातमी कानी पडून घरात आनंदाचं प्रसन्न वातावरण निर्माण होऊ शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)