Shani Nakshatra Parivartan: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनासोबत त्यांचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. शनी ग्रहाला न्याय आणि कर्माची देवता म्हणून ओळखले जाते. २०२४ मध्ये शनी कुंभ राशीत विराजमान असेल. ज्योतिषशास्त्रानुसार ६ एप्रिल रोजी शनीने पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या प्रथम चरणात प्रवेश केला होता. त्यानंतर तो आता येत्या १२ मे रोजी पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश करील आणि १८ ऑगस्टपर्यंत या चरणात उपस्थित असेल.
ज्योतिषशास्त्रात पूर्वा भाद्रपदाचे पहिले व दुसरे चरण शुभ मानले जाते. त्यामुळे शनी या चरणात असल्यास काही राशींच्या व्यक्तींना त्याचा खूप फायदा होईल. त्याशिवाय यामुळे त्या राशीधारक व्यक्तींच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.
मेष
शनीचे पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश करणे मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम देणारे असेल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटांवर तुम्ही सहज मात कराल, धन-संपत्तीचे सुख मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. समाजात मान-सम्मान वाढेल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाठीदेखील शनीचा पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणातील प्रवेश खूप फायदेशीर ठरेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल.
हेही वाचा: राहूची चाल, तुम्ही होणार मालामाल! पुढच्या ३७६ दिवसांत ‘या’ तीन राशींची भरभराट
कुंभ
कुंभ ही शनीची स्वराशी आहे. त्यामुळे शनीचा पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणातील प्रवेश खूप लाभकारी सिद्ध होईल. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)