Shani nakshtra gochar 2024 : शनिला कर्म दाता मानले जाते. शनि हा एकमेव असा ग्रह आहे जो माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी साडे सातीचा सामना करावा लागतो. शनि अत्यंत हळूवार चालणारा ग्रह आहे. शनि एका राशीत जवळपास अडीच वर्ष विराजमान राहतात. अशात एक राशिचक्र पूर्ण करण्यासाठी शनिला जवळपास ३० वर्षांचा कालावधी लागतो. राशीनुसार शनि एका ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा थेट परिणाम राशी चक्रातील इतर राशींवर पडतो.

येत्या ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. शनि राहुच्या नक्षत्र शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. राहु ग्रहाच्या नक्षत्रात शनि प्रवेश करत असल्यामुळे काही राशींना याचा चांगला फायदा मिळू शकतो. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या?

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
shani gochar 2025 | horoscope | astrology
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश
१९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान

शनि ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि २७ डिसेंबर पर्यंत याच नक्षत्रात विराजमान राहीन. या नंतर शनि पुन्हा पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार. शतभिषा नक्षत्र २७ नक्षत्रामध्ये २४ वा नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी ग्रह राहु आणि कुंभ राशी आहे. शनि या वेळी कुंभ राशीमध्ये विराजमान आहे.

हेही वाचा : सप्टेंबर सुरु होताच ‘या’ राशींच्या व्यक्तींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? ३ मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, कुणाला होणार फायदा?

मेष राशी (Mesh Zodiac)

मेष राशीच्या लोकांना शनि नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरू शकते. या लोकांचे ठरलेले काम पूर्ण होतील. तसेच धन धान्यामध्ये वाढ होईल. या राशीमध्ये शनि अकराव्या स्थानावर विराजमान आहे. यामुळे या लोकांना नोकरी व्यवसायात अधिक यश मिळू शकते तसेच आर्थिक स्थिती सुधारू शकते. हे लोक कर्जमुक्त होतील तसेच भविष्यासाठी धन प्राप्त करू शकतील. प्रत्येकाला या लोकांचे काम आवडू शकते. या लोकांची व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. शनि देवाच्या कृपेने या लोकांना नवीन प्रोजेक्ट, ऑर्डर मिळू शकतात. या दरम्यान या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन.

धनु राशी (Dhanu Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी शनिचे नक्षत्र परिवर्तन फायद्याचे ठरू शकते. अडकलेली कामे मार्गी लागतील ज्यामुळे यांना पैसा मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रात या लोकांना भरपूर लाभ मिळेल. नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. या लोकांना जीवनात सुख समृद्धी लाभेल. शनिच्या कृपेमुळे यांचे आरोग्य उत्तम राहीन.या लोकांचा मानसिक तणाव कमी होईल. यांना व्यवसायात नफा मिळू शकतो. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. अडकलेली सरकारी कामे पुन्हा सुरू होऊ शकतात.

हेही वाचा :

सिंह राशी (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी शनिचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ ठरू शकते. या राशीच्या लोकांना अनेक प्रकारे आनंद मिळू शकतो. या लोकांच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदेल. हे लोक त्यांच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकतील. त्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात भरपूर यश मिळू शकते. धाडस आणि आत्मविश्वास वाढताना दिसून येईल. यामुळे हे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)