Shani Paya Effects 2024: ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा चार पाउलांनी राशींमध्ये भ्रमंती करत असतो. सोने, चांदी, तांबे व लोह (लोखंड) अशा स्वरूपात ही पाऊले ओळखली जातात. याचा प्रभाव प्रत्येक राशीवर वेगवेगळा असू शकतो. मुळात शनीचे पाऊल कोणत्या स्वरूपाचे आहे हे कसे ठरते तर व्यक्तीच्या जन्म कुंडलीत चंद्राच्या स्थानावरून शनीच्या पाऊलाचे रूप ओळखता येते. ज्योतिषशास्रानुसार यंदाच्या वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये शनी देव नेमके कोणत्या राशीत कोणत्या पाऊलाने चालणार आहेत व त्याचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव होऊ शकतो हे आज आपण पाहणार आहोत.
२०२४ मध्ये ‘या’ राशींमध्ये शनीचे सोनपावलांनी भ्रमण
मिथुन रास
मागील वर्षी साडेसातीच्या फेऱ्यातून मोकळ्या झालेल्या मिथुन राशीत यंदा शनी सोनपावलांनी भ्रमण करणार आहेत. या कालावधीत मिथुन राशीला मिळणारा लाभ द्विगुणित होऊ शकतो पण कोणतीच गोष्ट सहज मिळणार नाही. तुम्हाला प्रचंड मेहनत केल्यावरच त्याचे फळ मिळेल पण जेव्हा लाभ होईल तेव्हा तुम्ही भारावून जाल इतकी त्यात शक्ती असेल.
वृश्चिक रास
ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या मंडळीनां सोनपावलांनी शनीची भ्रमंती फारशी लाभदायक ठरण्याचे योग नाहीत, उलट या काळात घाव सहन करावे लागू शकतात. आर्थिक अडचणी वाढू शकतात. नोकरीच्या ठिकाणी शक्य होईल तितके वादातून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
मकर रास
मकर राशीला शारीरिक कष्ट सहन करावे लागू शकतात. काही प्रमाणात मानसिक त्रास सुद्धा जाणवू शकतो पण या कालावधीत मित्र व कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा लाभू शकतो ज्यामुळे तुमचे प्रश्न सहज सुटतील.
‘या’ राशींमध्ये शनीची लोहाच्या पावलांनी भ्रमंती
सिंह रास
सिंह राशीच्या खर्चार्चे आकडे वाढणार आहेत त्यामुळे वेळोवेळी आधी गुंतवणूक व बचतीवर भर द्या जेणेकरून भविष्यात आर्थिक तंगी जाणवणार नाही. प्रवासाचे योग आहेत व पण काळजी आवश्यक.
धनु रास
उधार दिलेले पैसे पुन्हा मिळू शकतात. न बोलता, न मागता कामाचा मोठा मोबदला मिळू शकतो. संततीप्राप्तीचे सुख नशिबात लिहिलेले आहे, मात्र त्यात अनेक अडथळे पार करावे लागू शकतात.
‘या’ राशींमध्ये तांब्याच्या पावलाने येणार शुद्धता
वृषभ रास
प्रचंड मोठ्या बदलाचे व प्रगतीचे संकेत घेऊन शनीदेव तुमच्या राशीत प्रभावी असणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी अनपेक्षित बोनस मिळू शकतो. पगारवाढीमुळे तुमची जीवनशैली सुधारण्याची चिन्हे आहेत.
कन्या रास
शनीच्या भ्रमणामुळे कन्या राशीच्या विद्यार्थी वर्गाला विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. बेरोजगारांना नोकरीची संधी चालून येईल.
कुंभ रास
कुंभ राशीच्या मंडळींना या कालावधीत भौतिक सुख प्राप्त होऊ शकते.संतती सुखामुळे भारावून जाल. परदेश प्रवासाचे योग आहेत.
‘या’ राशींचे भाग्य शनीमुळे चांदीसारखे लखलखणार
कर्क रास
नोकरी व विशेषतः स्वतःचा व्यवसाय मोठ्या धनलाभाचे योग आहेत. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. धार्मिक कार्यांमधील सहभाग वाढू शकतो.
हे ही वाचा<< ८२ दिवस प्रचंड पैसे कमावतील ‘या’ तीन राशी; २ एप्रिलपर्यंत बुध ग्रह सरळ मार्गी देणार लक्ष्मीकृपा व यश
तूळ रास
पदोन्नती व पगारवाढीचे संकेत आहे. या कालावधीत तुमचे पूर्व वैर सोडवले जाऊ शकते. मित्र मैत्रिणींचा सहवास लाभेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)