Shash- Gajkesari Rajyog, Rashi Bhavishya: ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या आपल्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभ मध्ये स्थिर आहे. शनीच्या स्थानानुसार सध्या शश महापुरुष राजयोग तयार होत आहे. पंच महापुरुष योगांपैकी एक असा शश महापुरुष योग हा अत्यंत शुभ मानला जातो. दुसरीकडे १ मे रोजी गुरु गोचर करून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरु गोचरानंतर ९ मे ला चंद्रमा सुद्धा गोचर करून वृषभ राशीत स्थिरावणार आहे. गुरु व चंद्राच्या युतीने गजकेसरी राजयोग निर्माण होत आहे. विशेष म्हणजेच त्यानंतर लगेचच धन- वैभवाचा कारक शुक्र सुद्धा वृषभ मधील गजकेसरी राजयोगाला बळ देणार आहे. हे दोन्ही योग एकत्र जागृत असल्याने काही राशींच्या कुंडलीत अत्यंत सकारात्मक असे बदल होणार आहेत. काहींना नवी नोकरी तर काहींना प्रचंड प्रगती लाभेल. विविध मार्गांमधून आपल्याकडे माता लक्ष्मीचे आगमन होण्याची चिन्हे आहेत. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांच्या नशिबात नेमका कशा पद्धतीचा लाभ लिहून ठेवलाय हे पाहूया..
शनीचं बळ व गुरुची बुद्धी, ‘या’ राशींना लाभेल समृद्धी
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
वृषभ राशीच्या मंडळींना शश व गजकेसरी राजयोग हा अत्यंत लाभदायक असणार आहे. शश राजयोग हा आपल्या राशीच्या कर्म भावी तयार होत आहे तर गजकेसरी राजयोग हा आपल्या राशीच्या लग्न भावी तयार होत आहे. या दोन्ही स्थिती आपल्यासाठी खूप लाभदायक आहे. आपल्या व्यक्तिमत्वाला विशेष झळाळी मिळू शकेल. लोक आपल्याकडे आकर्षित होतील. करिअरमध्ये मोठे व महत्त्वाचे बदल होणार आहे, मनाला हवी तशी नवी नोकरीची संधी मिळू शकेल. व्यवसायात वृद्धी होईल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. आरोग्यात सुधारणा होऊ शकते, वैवाहिक नाती व प्रेम संबंध सुधारतील.
मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)
मकर राशीच्या लोकांना सुद्धा शश व गजकेसरी राजयोग प्रचंड फायद्याचा असू शकतो. आपल्याला अप्रत्यक्ष स्वरूपात लाभ होणार आहे ज्यामुळे तुमचे आर्थिक फायदे होऊ शकतील. बँक बॅलन्समध्ये वाढ होऊन आपल्या आर्थिक समस्या, पैशांची चणचण दूर होऊ शकते. नोकरीत स्थिरता अनुभवाल. प्रेमाच्या नात्यात यश मिळेल. नाती भक्कम होतील. आपल्या कामाच्याबाबत योजना यशस्वी होतील. इच्छा पूर्ण करणारा हा कालावधी असेल.
हे ही वाचा<< सोनपावलांनी शनी ‘या’ राशींच्या कुंडलीला देणार चमक; मे ते ऑगस्टमध्ये धनाने भरेल झोळी, आयुष्यात बदलाचा संकेत
कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)
कुंभ राशीचे स्वामी शनी आहेत त्यामुळे शनी शश राजयोगाचा सर्वोत्तम प्रभाव आपल्या स्वामित्वाच्या राशीत दाखवून देतील. गजकेसरी राजयोग सुद्धा चांगले परिणाम देऊ शकेल. व्यावसायिकांसाठी हा कालावधी सर्वोत्तम असू शकतो. आपण खूप नफा मिळवू शकाल. आर्थिक स्रोत वाढतील,जीवनात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचा योग आहे. शिवाय जुन्या गुंतवणुकीमधून आर्थिक फायदा होऊ शकेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)