Shani Nakshtra Transit: शनि २०२३ या वर्षात एकूण तीन वेळा आपले नक्षत्र बदलणार आहेत. शनि जेव्हाही नक्षत्र किंवा राशी परिवर्तन करतात तेव्हा संबंधित रासच नव्हे तर त्याचा प्रभाव १२ राशींवर दिसून येतो. १५ मार्चला शनिदेव शतभिषा नक्षत्रात स्थिर झाले आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार एप्रिल महिन्यापासून शनिदेव कुंभ राशीत व शतभिषा नक्षत्रात उच्च स्थानी स्थिर होणार आहेत. ज्योतिष अभ्यासक सांगतात की, शनिदेव अडीच वर्ष कोणत्याही राशीत स्थिर असतात. त्यात २१ एप्रिलला शनिदेव व गुरुदेव भ्रमण कक्षेत एकत्र येणार आहेत. शनिदेवाचे शतभिषा नक्षत्रातील स्थान व गुरूसह युती यामुळे पुढील सहा महिने म्हणजेच १७ ऑक्टोबर २०१३ पर्यंत काही राशींच्या भाग्यात अत्यंत शुभ लाभ काळ जुळून येणार आहेत.

१७ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ राशींना सोन्याचा काळ अनुभवता येणार

वृषभ रास (Taurus Zodiac)

शनिदेव आपल्या मूळ केंद्र त्रिकोण राशीत प्रभावी असल्याने आपली राशीत शश राजयोग तयार होत आहे. यामुळे आपल्याला आर्थिक उन्नत्तीचा काळ अनुभवता येऊ शकते. सुख सुविधा वाढल्याने तुमच्या जीवनशैलीत बदलाचे संकेत आहेत. धन लाभ व मान- सन्मान वाढल्याने तुमच्यावर जबाबदारी सुद्धा वाढू शकते. व्यवसाय वृद्धी होऊन नशिबाच्या दाराचे टाळे उघडू शकते. नोकरदार मंडळींसाठी सुद्धा अनपेक्षित पगारवाढीची चिन्हे आहेत. सरकारी योजनांचा लाभ होऊ शकेल.

Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
rahu shukra yuti 2025 in marathi astrology
Rahu Shukra Yuti 2025: २०२५ वर्ष ‘या’ तीन राशींसाठी सुखाचं! राहू-शुक्राच्या संयोगाने मिळणार प्रचंड पैसा, आनंद अन् मान सन्मान
Gajakesari Raja Yoga
१३ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींना मिळणार भरपूर पैसा; गजकेसरी राजयोगाच्या प्रभावाने आयुष्यात येणार धनसंपत्तीचे सुख

तूळ रास (Libra Zodiac)

तूळ राशीसाठी करिअरमध्ये मोठ्या प्रगतीची संधी आहे. हा येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. पगारवाढीचा योग आहे. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून प्रचंड लाभ होऊ शकतो. आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. कुंडलीमध्ये त्रिकोण राजयोग निर्माण होत असल्याने तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो.

मकर रास (Capricorn Zodiac)

मकर राशीसाठी शनिदेव हे स्वामीरुप आहेत. या काळात तुम्हाला आर्थिक प्रगतीचा अनुभव घेता येईल. आपला आत्मविश्वास प्रचंड वाढेल पण तुम्ही त्याचे परिवर्तन अहंकारात होऊ देऊ नका. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. तुमच्या धनलभाला खर्चाचे ग्रहण लागू शकते म्हणूनच वेळोवेळी सेव्हिंग करण्यावर भर द्या.

हे ही वाचा<< २१ एप्रिलला शनिदेव गुरुसह करणार युती; ‘या’ तीन राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ व मोठे बदल होणार?

कुंभ रास (Aquarius Zodiac)

कुंभ राशीत शनिदेव उच्च स्थानी असल्याने शश महापुरुष राजयोग तयार होत आहे. यामुळे तुमचा मान- सन्मान वाढीस लागू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने मानसिक शांती अनुभवता येऊ शकते. व्यवसाय विकास झाल्याने तुम्हाला धनप्राप्तीचा सुवर्ण योग आहे. हा येणारा काळ तुमच्यासाठी वरदान सिद्ध होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader