Mahadhan Rajyoga In Kundali: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर करून राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. याचा प्रभाव सर्व राशींच्या आयुष्यात कमी अधिक तसेच शुभ- अशुभ प्रमाणात दिसून येऊ शकतो. काही वेळा एकाच राशीत काही ग्रह एकत्र आल्यास त्यातून राजयोग निर्माण होऊ शकतात. असाच एक राजयोग काही दिवसातच वृषभ राशीमध्ये तयार होत आहे. विशेष म्हणजे तब्बल ५० वर्षांनी असा दुर्मिळ राजयोग जुळून आल्याने प्रभावित राशींना प्रचंड लाभदायक काळ अनुभवता येऊ शकतो. शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश घेताच हा महाधन राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाने तीन राशींच्या भाग्यात कोट्याधीश होण्याची संधी आहे. या राशी कोणत्या व त्यांना नेमका काय व कसा लाभ होणार हे पाहूया…
धनराजयोग बनल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत?
कुंभ रास (Kumbh Rashi)
धन राजयोग कुंभ राशीला अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. तुमच्या राशीला भाग्येश स्थानी शुक्र आहे जो तुमच्या गोचर कुंडलीत चतुर्थ स्थानी आहे. यानुसार आपल्या राशीत केंद्र त्रिकोण व मालव्य राजयोग सुद्धा तयार होत आहे. येत्या काही काळात आपल्याला प्रहचंद व अनपेक्षित असा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रचंड कौतुक अनुभवता येईल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढीस लागू शकतो. येत्या काळात तुमच्या व्यक्तिमत्वातील काही पैलू खुलून समोर येऊ शकतात. तुम्हाला परदेश वारीचे सुद्धा योग आहेत मात्र तब्येतीची काही प्रमाणात काळजी घ्यावी लागू शकते. तुमच्यावर माता सरस्वती व माता लक्ष्मी दोघींचा कृपाशिर्वाद राहू शकतो.
मकर रास (Makar Rashi)
मकर राशीसाठी धनराजयोग नशिबाचे दार खोलण्याची संधी बनू शकतो. तुमच्या गोचर कुंडलीत भाग्य गुरु बुधदेव असून ते गोचर कुंडलीत केंद्र स्थानी विराजमान आहेत. यासह शुक्र देव सुद्धा ६ एप्रिलपासून आपल्या राशीच्या प्रभावकक्षेत आले आहेत यामुळे तयार होणाऱ्या राजयोगाने तुमचे नशीब कलाटणी घेऊ शकते. शनिदेव तुमच्या राशीच्या धनस्थानी आहेत. शनीचा प्रभाव हा तगडा मानला जातो त्यामुळे तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद व त्यात शनीची जोड यामुळे प्रचंड धनलाभ होऊ शकतो. तुमच्या प्रत्येक निर्णयातून आयुष्याला कलाटणी मिळत जाऊ शकते त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी अगदी शुभ काळ आहे.
हे ही वाचा<< “राष्ट्रवादीत बंडखोरी निश्चित कारण कुंडलीत…” ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, “१५ एप्रिल नंतर…”
वृषभ रास (Vrushabh Rashi)
महाधन राजयोग बनल्याने वृषभ राशीला लाभदायक स्थिती तयार होऊ शकते. तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीत नवव्या व दहाव्या स्थानी तुमच्या राशीचे स्वामी स्थित आहेत त्यामुळे काहीच दिवसात मोठे बदल अनुभवण्याची संधी मिळू शकते. तुमच्या राशीच्या कुंडलीत शश, मालव्य व लक्ष्मी राजयोग सुद्धा तयार झाल्याने धनलक्ष्मी तुमच्यावर मेहेरबान असू शकते. या काळात तुम्हाला कौटुंबिक सुखाने भारावून जायला होऊ शकते. आजवर न अनुभवलेले प्रेम तुमची वाट पाहत आहे. नोकरदार मंडळींना पगारवाढ व पदोन्नतीचे योग आहेत. तसेच तुमचे आर्थिक मिळकतीचे स्रोत सुद्धा वाढू शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)