-सोनल चितळे

Aquarius Yearly Horoscope 2023 Predictions in Marathi: कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. शनीजवळ सहनशीलता, चिकाटी, दीर्घोद्योग, काटकसर आणि गंभीर प्रवृत्ती आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींकडे देखील हे गुण पुरेपूर आढळतात. त्यांचे कामातील नियोजन उत्तम असते. कुशाग्र बुद्धिमत्ता, संशोधक वृत्ती, उत्तम बौद्धिक पृथक्करण क्षमता ही कुंभ राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये आहेत. त्यांची आकलनशक्ती आणि ज्ञानाची परिपक्वता अफाट असते. अशा या कुंभ राशीच्या मंडळींना २०२३ हे वर्ष कसे असेल ते पाहू .

यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल आपल्या तृतीयातील मेष राशीत असेल. २८ नोव्हेंबरपर्यंत राहूदेखील मेषेतच असेल.नव्या मोठ्या जबाबदाऱ्या पेलण्याचे बळ मिळेल. तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वतःची प्रगती कराल. २१ एप्रिलपर्यंत गुरू द्वितीय स्थानातील मीन राशीत असेल. २१ एप्रिलला गुरू तृतीयातील मेष राशीत प्रवेश करेल. संपूर्ण वर्षभर गुरुबल चांगले आहे. तसेच १७ जानेवारीला शनीचा आपल्या कुंभ राशीत प्रवेश झाला आहे. त्यामुळे साडेसातीचा पहिला टप्पा संपून आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. महत्वाचे निर्णय घ्याल. गंभीरपणे आणि व्यावहारिक दृष्टीकोनातून जीवनाकडे पाहाल. ग्रहबल चांगले असले तरी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावी. बौद्धिक पृथक्करण आणि विश्लेषण उत्तमरीत्या जमेल. अशा या महत्वाच्या ग्रह बदलांसह इतर सर्व ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करता एकंदरीत कुंभ राशीचे वार्षिक ग्रहफल असे आहे…

Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : शुक्र करणार धनु राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार पैसाच पैसा, मिळेल प्रत्येक कामात यश

फेब्रुवारी :

शनीची मेहनत, शुक्राची सौंदर्यदृष्टी आणि रवीचे यश यांचा त्रिगुणी योग आहे. हाती घेतलेल्या कार्यात सफलता मिळेल. चिकाटी सोडू नका. नोकरीमध्ये मंगळाच्या साथीने वरिष्ठ वर्गापुढे आपली मते ठामपणे मांडाल. व्यवसायात समस्यांवर उपाय शोधाल. व्यावसायिक नाती जोपासाल. व्यक्तींच्या गुणांची कदर कराल. विद्यार्थी वर्गाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. शनी आपल्या कष्टाचे चीज नक्की करेल. दाम्पत्य सुख चांगले मिळेल. रोग प्रतिकार शक्ती वाढवावी.

हे ही वाचा<<फेब्रुवारीत ‘या’ व्यक्तींना प्रचंड धनलाभाची संधी; सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ राशींचं मासिक भविष्य

मार्च :

द्वितीय स्थानातील ग्रहस्थितीचा आपल्या वक्तृत्वावर खूप चांगला परिमाण होईल. शब्दाचे वजन वाढेल. पैसा, प्रसिद्धी मिळेल. नोकरीतील सादरीकरण अत्यंत प्रभावी ठरेल. व्यवसायाच्या निमित्ताने नव्या ओळखी वाढतील. व्यवसायात वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला वेळेचे गणित नव्याने बसवावे लागेल. बुद्धिमत्तेसह व्यवहारज्ञानाचा उपयोग केल्यास अधिक लाभदायक ठरेल. ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी संगीत, कला यांचा आधार घ्यावा.

एप्रिल :

द्वितीय आणि तृतीय स्थानातील रवीचे भ्रमण अतिशय हितकारक असेल. धनसंपत्ती वाढेल. आत्मविश्वास दुणावेल. नोकरीच्या कामात हिंमतीने आगेकूच कराल. व्यवसायातील खाचाखोचा जाणून घ्याल. अंदाज खरे ठरतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर गुंतवणूकीचा चांगला अभ्यास कराल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर लक्ष
केंद्रीत करावे लागेल. प्रलोभनांपासून दूर राहावे. परदेशी शिक्षणाची तयारी करायला सुरुवात करावी. वातविकार बाळावण्याची शक्यता आहे.

मे :

२१ एप्रिलला झालेला गुरूचा राशी बदल आपल्यासाठी अतिशय लाभकारक आहे. परदेशाशीसंबंधित कामांना गती मिळेल. अर्थात तसे प्रयत्न देखील व्हायला हवेत. कला, क्रीडा आणि बौद्धिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवाल. नोकरीतील कामकाज धिम्या गतीने पुढे सरकेल. व्यावसायिकांचा वेग मात्र चांगला असेल. आर्थिक उन्नती करणारे ग्रहयोग आहेत. पित्त आणि डोकेदुखीचा त्रास आटोक्यात ठेवावा. अन्यथा दुखणे वाढेल.

जून :

स्थावर मालमत्तेविषयी हालचाल सुरू होतील. खरेदी, विक्री वा सरकारी कागदपत्रे यासारख्या कामांना गती मिळेल. नोकरीच्या कामात सहकारी वर्गाकडून उत्तम साथ मिळाल्याने उत्साह वाढेल. उद्योजक, व्यावसायिक मंडळींना नवे प्रकल्प सादर करण्यास योग्य कालावधी आहे. विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जोरदार करावी. बुद्धिमत्तेला मेहनतीची जोड मिळाली तर अधिक फायदेशीर ठरेल. जोडीदाराच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल.

जुलै :

परदेशगमन योग आहे. शिक्षणासाठी किंवा कामानिमित्त परदेशवारी कराल. नोकरीतील कामात प्रगती होईल. जबाबदाऱ्या वाढतील. ताण घेऊ नका. एकेक कामे हातावेगळी कराल. व्यवसायात संवाद वाढवल्याने महत्वाची कामे मार्गी लागतील. विद्यार्थी वर्गाच्या मेहनतीला यश मिळेल. जोडीदाराला त्याच्या कामात नवी आव्हाने स्वीकारावी लागतील. विवाहोत्सुक मंडळींचा विवाह जुळेल. चिंता, काळजी करू नका.

ऑगस्ट :

कौटुंबिक प्रश्न सोडवताना बौद्धिक पातळीवरून बघू नका. त्यासाठी भावनिक दृष्टिकोनच उपयोगी पडेल.सगळ्या गोष्टी तर्काच्या चाकोरीत बसणाऱ्या नसतात हे लक्षात घ्यावे. आर्थिक गुंतवणूक लाभकारक ठरेल.विद्यार्थी वर्गाने अभ्यासासोबत तब्येतीची काळजी घ्यावी. अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी मित्रमंडळींच्या भेटीगाठी घ्याव्यात. नोकरीनिमित्त प्रवास कराल. व्यवसायात भरघोस यश मिळेल. जोडीदारासह मनमोकळे संबंध राहतील.

सप्टेंबर :

विशेष खबरदारी न घेतल्यास प्रवासात त्रास होईल. मानसिक तणाव वाढेल. नोकरी व्यवसायात कायम सतर्क राहावे. आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ निघू शकतो. तेव्हा शब्द सांभाळून वापरावेत. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल. विद्यार्थी वर्गाने अधिक मेहनत घ्यावी. प्रयोग, वक्तृत्व आणि भाषेसंबंधीत अभ्यास यावर लक्ष केंद्रित करावे. जोडीदाराला त्याच्या कामात विशेष यश मिळेल. गुंतवणूक करताना जपून, सांभाळून करावी.

ऑक्टोबर :

भाग्यकारक ग्रहमानामुळे मेहनत फळास येईल. कामाचा बोजा हलका होईल. नोकरीतील आव्हाने सहजपेलाल. व्यवसायात नवी झेप घेण्याची तयारी कराल. संशोधन महत्वाचे ठरेल. विद्यार्थी वर्गाला ग्रहमान साहाय्यकारी आहे. संधीचे सोने करावे. जोडीदारासह उत्तम सूर जुळतील. एकमेकांच्या कामाचे कौतुक वाटेल. विवाहोत्सुक मंडळींना मनपसंत जोडीदार मिळेल. परदेशी प्रवासाचा योग आहे. संतती प्राप्तीसाठीचे प्रयत्न यशस्वी होतील.

हे ही वाचा<< Capricorn Horoscope 2023: शनीच्या मकर राशीला कधी मिळेल मोठा धनलाभ? सोनल चितळेंनी सांगितलं १२ महिन्याचं राशीभविष्य

नोव्हेंबर :

दशमातील रवी, मंगळ कामाच्या बाबतीत उत्तम फळ देतील. नोकरीच्या ठिकाणी उच्च पद भूषवाल. कामाची दखल घेतली जाईल. व्यवसाय वृद्धीसाठी ग्रहमान हितकर आहे. नव्या संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी वर्गाने मेहनत घेणे इष्ट आहे. बुद्धिमत्तेला सातात्याची जोड मिळणे अत्यंत आवश्यक आहे. अतिरिक्त आत्मविश्वास थोडा बाजूला ठेवावा. आर्थिक धनलाभ होईल. कामाच्या व्यापातून स्वतःसाठी थोडा तरी वेळ राखून ठेवा.

डिसेंबर :

२८ नोव्हेंबरला राहूचा आपल्या द्वितीय स्थानातील मीन राशीत प्रवेश झाला आहे. वाणीला चांगली धार येईल. पण अशा वेळी शब्द जपून वापरावेत. नोकरी व्यवसायात गुरुबल चांगले असल्याने देशी विदेशी प्रवास घडतील. परदेशासंबंधीत कामांना वेग येईल. विद्यार्थी वर्गाच्या कष्टाचे चीज होईल. आजूबाजूला असलेली आकर्षणे आपल्यावर प्रभाव टाकू पाहतील. वेळीच स्वत:ला सावरा. जोडीदार आपल्या कामकाजात जातीने लक्ष घालेल. भरपूर धनलाभ होईल.

हे ही वाचा<< २१ एप्रिलपासून मोदींच्या कुंडलीत कष्टी दिन! ज्योतिषतज्ज्ञ म्हणतात “२०२४ ला सत्ता टिकवण्यासाठी मुस्लिमच..”

२०२३ या वर्षात गुरुबल चांगले आहे. शनी अतिशय साहाय्यकारी आहे. साडेसातीचा दुसरा टप्पा असलातरी शनी आपल्या जिद्दीचे, चिकाटीचे आणि मेहनतीचे शुभ फळ नक्की देईल. कामकाजात यश, प्रसिद्धी, पैसे कमवाल. मित्र परिवाराच्या भेटीगाठी आनंद आणि उत्साहवर्धक ठरतील. ऑगस्ट ते ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यात स्थावर मालमत्तेसंबंधीत कामे वेग घेतील. भावंडांचा आनंददायी सहवास लाभेल. विद्यार्थी वर्गाला मेहनातीचे फळ मिळेल. तसेच परदेशगमन योगही आहे. विवाहोत्सुक मंडळींना जोडीदार निवडीचे चांगले योग आहेत. संतती प्राप्तीसाठीच्या प्रयत्नांना विलंब होईल. गुंतवणूकदारांना एप्रिलच्यापूर्वी तसेच ऑक्टोबर ते डिसेंबर हे महिने भरपूर धनलाभाचे आहेत. पित्त, अपचन, ताण, सांधे, स्नायू यांचे
आरोग्य सांभाळल्यास २०२३ हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय लाभकारक ठरेल.