Paush Amavasya 2022 Date and Time: हिंदू धर्मात पौष मास हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सरत्या वर्षात २३ डिसेंबरला म्हणजेच येत्या शुक्रवारी पौष अमावास्या असणार आहे. वैदिक ज्योतिषानुसार पौष अमावास्या ही ५ राशींसाठी अत्यंत शुभ सिद्ध होणार आहे. पौष महिन्यातील अमावस्या ही शुक्रवारी येत आहे, जो की वैभवदाता शुक्र ग्रह व माता वैभवलक्ष्मीचा वार मानला जातो. या महिन्यात काही दिवसांपूर्वीच म्हणजेच १६ डिसेंबरला सूर्याचे गोचर होऊन ग्रहांचा राजा धनु राशीत स्थिर झाला आहे. शनी, बुध व गुरु सुद्धा अत्यंत शुभ स्थितीत असून त्यांच्या युतीने दुर्मिळ असा केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. या ज्योतिषीय घटनांच्या प्रभावाने खालील ५ राशींसाठी अत्यंत फायदेशीर काळ सुरु होणार आहे. येत्या काळात या ५ राशींना प्रचंड धनलाभासह प्रगतीचे योग तयार होत आहेत.

कधी सुरु होत आहेत पौष अमावस्या?

पौष महिन्यातील अमावास्येची तिथी २२ डिसेंबर २०२२ च्या संध्याकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी सुरु होणार आहे तर २३ डिसेंबर २०२२ च्या सदुपारीं ३ वाजून ४६ मिनिटांवर अमावस्या संपेल. उदयतिथी नुसार २३ डिसेंबर हा दिवस पौष अमावास्येची मूळ तिथी मानला जाईल.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार

‘या’ राशींना पौष अमावस्या देऊ शकते धनलाभ

कर्क (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी पौष अमावस्या अत्यंत शुभ ठरू शकते. विशेषतः तुमच्या करिअर व कामाच्या बाबत अनेक प्रगतीच्या संधी तुमच्या नशिबाचे दार ठोठावतील. तुम्हाला येत्या काळात जुन्या गुंतवणुकीतून मोठा धनलाभ होऊ शकतो. या आर्थिक नफ्याचा वापर करण्यासह गुंतवणूक करायला सुद्धा विसरू नका.

कन्या (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी नवनवीन संधी घेऊन पौष अमावस्या येणार आहे. तुम्हाला स्वतःला आर्थिक लाभासाठी अनेक कल्पना सुचतील. यातील काही विचार हे निरर्थक वाटू शकतील पण जर तुम्ही त्यावर नीट विचार करून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काम केल्यास यातूनच प्रचंड धनलाभ होऊ शकतो. आयुष्यात एक सुखाची व सकारात्मक काळ अनुभवण्याचे भाग्य आपल्या कुंडलीत आहे.

तूळ (Libra Horoscope)

पौष अमावस्या तुमच्यासाठी करिअरमध्ये प्रगती घेऊन येऊ शकते. अनेक अडकलेली कामे मार्गी लागण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करायला चुकू नका .

हे ही वाचा<< १२ जानेवारीपासून ‘या’ ३ राशींना प्रचंड धनलाभाची संधी; २०२३ च्या मार्चपर्यंत कमाईत वाढ होण्याचे योग

वृश्चिक (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या विशेषतः विद्यार्थी दशेतील मंडळींसाठी येणारी पौष अमावस्या प्रगतीचे योग घेऊन येत आहे. तुम्ही जर नव्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला लवकरच मोठ्या पगारवाढीसह उत्तम ऑफर्स मिळू शकतात.

हे ही वाचा<< मार्च २०२३ पर्यंत ‘या’ ६ राशी होणार श्रीमंत? ३० वर्षांनी शनि व सूर्य एकत्र आल्याने प्रचंड धनलाभाची संधी

कुंभ (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी तर येणारा काळ सुखाचे अनेक योग घेऊन येत आहे. १७ जानेवारी २०२३ मध्ये शनि गोचर होण्याआधी आता सर्वात लाभाच्या स्थानी कुंभ रास आहे. तुमचे जुने वाद संपुष्टात येऊन नात्यात प्रेम वाढीस लागू शकते. याच नात्यांमधून तुम्हाला आर्थिक लाभाचेही संकेत आहेत. समाजात तुमचा मान वाढू शकतो.

(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader