Shani Gochar 2025 Date: ज्योतिषशास्त्रात शनी ग्रह सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. त्यामुळे शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालावधी लागतो. तसेच शनीला एकाच राशीत पुन्हा जाण्यासाठी तब्बल तीस वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूप खास मानले जाते. शिवाय शनी कर्म फळदाता आणि न्यायप्रिय देवता असल्यामुळे वाईट कर्म करणाऱ्यांना तो शिक्षा देतो. तसेच अशा व्यक्तींच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण करतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या १५ नोव्हेंबर रोजी शनी मार्गी होणार असून तो २०२५ मध्ये राशी परिवर्तन करणार आहे. शनीच्या या राशी परिवर्तनाचा काही राशींच्या व्यक्तींवर अधिक प्रभाव पाहायला मिळेल. शनी मार्च २०२५ मध्ये मीन राशीत राशी परिवर्तन करणार असून तो सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. २८ मार्च २०२५ पर्यंत या राशीत राहील.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शनीचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणामकारक ठरेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.

वृश्चिक

शनीचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर करेल. या काळात तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील. भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. कष्टाचे गोड फळ मिळेल. जुने वाद मिटतील. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. कामाच्या निमित्ताने दूरचे प्रवास करावे लागतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल.

हेही वाचा: पुढचे १८८ दिवस शनी देणार बक्कळ पैसा; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी शनीचे राशी परिवर्तन अनुकूल सिद्ध होईल. या काळात आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. या काळात आत्मविश्वास वाढेल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. करिअरमध्ये यश मिळेल. नवीन लोकांबरोबर ओळख होईल. घरात शांतीचे आणि आनंदाचे वातावरण असेल. या काळात सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात खूप प्रगती कराल. मुलांबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)