Shani Sade Sati 2023: शनिच्या साडे सातीचं नाव जरी काढलं तरी अनेकांना धडकी भरते. पण तुम्हाला माहीत आहे का की अशा काही राशी आहेत ज्यांना साडे साती हा आयुष्यातील सर्वात शुभ काळ ठरू शकतो. शनिच्या साडे सातीचा काळ काही राशींसाठी प्रबळ भाग्योदय व आर्थिक फायद्याची सुचिन्हे घेऊन येणारा असतो. पण असे नेमके का होत असावे? तसेच अशा कोणत्या राशी आहेत ज्यांच्यवर शनिची कृपादृष्टी कायम असते? याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत
ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह इतर राशींमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या राशीतील इतर ग्रहांच्या युतीने अनेक योग बनायला सुरुवात होते. याचा थेट प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. सर्व ग्रहांमध्ये शनिचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण शनिच्या चालीवरून कोणत्या राशीची साडेसाती सुरु होईल याविषयी माहिती मिळते. तुम्हाला ठाऊक आहे का की, शनी महाराज हे प्रत्येकासाठी वाईटच असतात असे नाही. काही ग्रह-नक्षत्रांची दशा अशी असते की, त्यामुळे व्यक्तींवर शनीचा वाईट प्रभाव अजिबात पडत नाही.
ज्योतिषांच्या माहितीनुसार, एखाद्या राशीचा ग्रह स्वामी किंवा शुभ ग्रहाची दशा किंवा महादशा चालू असेल तर त्यांच्यावर शनीची वक्रदृष्टी सहसा पडत नाही. उलट जर या काळात त्यांच्या कुंडलीत शनिचा शिरकाव झाला तर त्या व्यक्तीला दुप्पट लाभ होण्याचे योग असतात. अशा स्थितीत त्या व्यक्तीला तेव्हा मान-सन्मान, पैसा आणि सुख या गोष्टी सहज उपलब्ध होऊ शकते.
Vastu Shastra: पती पत्नीने एका ताटात का जेवू नये? भीष्म पितामह यांनी महाभारतात दिलेलं उत्तर पाहा
ज्योतिष शास्त्र सांगते की, शनिदेव हे मकर आणि कुंभ या दोन राशीचे स्वामी आहेत. या राशींवर शनिचा वाईट प्रकोप किंवा साडेसातीचा वाईट परिणाम होण्याची शक्यता कमी असते. तूळ राशीत शनी हा उच्चस्थानी असल्याने अशावेळी शनि साडेसाती या राशीच्या व्यक्तीवर वाईट परिणाम करण्याची शक्यता कमी असते.
जेव्हा शनी एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये तिसऱ्या, सहाव्या, आठव्या आणि बाराव्या घरात आणि उच्च स्थानी असेल तरी शनि प्रदोष आपल्याला धोक्याचे ठरण्याची शक्यता नसते. तर अन्य प्रकार म्हणजे ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चंद्र उच्च स्थानी असेल तर शनिची वक्रदृष्टी प्रभाशाली ठरण्याची शक्यता कमी असते.
दरम्यान, येत्या नववर्षात म्हणजेच १७ जानेवारीला शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे याचा परिणाम इतर राशींवर दिसून येईल. ज्योतिष तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार यामुळे काही राशींच्या नशिबात भाग्योदय होणार आहे.
(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)