Shani Sade Sati 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये शनिला पापी आणि क्रूर ग्रह मानले जाते. शनि सर्व ग्रहांपेक्षा हळू चाल चालतो. तो कर्मानुसार लोकांना फळ देतो त्यामुळे त्याला कर्मदाता म्हणतात. शनिचा अशुभ प्रभावापासून सर्व जण घाबरतात. शनिच्या अशुभ प्रभावामुळे अनेकदा व्यक्तीच्या जीवनात अडचणी येतात आणि विविध समस्येला सामोरे जावे लागते.
शनि ज्या राशीतून भ्रमण करतो त्या राशीला व त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीला साडेसातीला सामोरे जावे लागते. प्रत्येक राशीला आयुष्यात एकदा तरी साडेसातीला सामोरे जावे लागते. साडेसाती हा एक अडचणीचा काळ समजला जातो. (shani sade sati will start on mesh rashi after 30 years how will be a new year 2025)
शनिची साडेसाती
वर्ष २०२५ मध्ये शनिची साडेसातीचा परिणाम कौंटुबिक जीवनावर पडणार आहे. घरामध्ये वादविवाह वाढू शकतात. घरगुती वादविवादामुळे मानसिक ताण वाढेल. घरात नकारात्मक ऊर्जेमुळे मानसिक समस्या दिसून येईल. मोठ्या भावाबरोबर कोणत्याही गोष्टीवरून वाद निर्माण होऊ शकतो.
जेव्हा शनि देव जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत वक्री अवस्थेत उलट चाल चालणार त्या दरम्यान अडचणी वाढू शकतात. या दरम्यान आर्थिक नुकसान होऊ शकते. धनसंपत्तीची देवाणघेवाण खूप समजूतदारीने करावी लागेल. तसेच गुंतवणूकीसंदर्भात सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणतेही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी गंभीर विचार करावा.
या राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिची साडेसाती सुरू होताच मेष राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. डोळ्यांशी संबंधित समस्या वाढणार. पायाला दुखापत होऊ शकते.
खर्च वाढणार
वर्ष २०२५ मध्ये शनि मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या राशीवर साडेसातीचा पहिला चरण सुरू होणार. शनिची साडेसातीचा पहिला चरण मेष राशीच्या लोकांसाठी अशुभ राहणार. या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या राशीच्या लोकांच्या खर्चामध्ये वृद्धी होऊ शकते. पगारापेक्षा खर्च जास्त होऊ शकतो. गुंतवणूक करताना मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)