Dhanu Rashi Yearly Horoscope 2023: ज्योतिष शास्त्रानुसार धनु राशीचे स्वामी स्वतः बृहस्पती गुरुदेव आहेत. गुरु ग्रह हा संपत्ती, प्रगती व समृद्धीचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु ग्रह सकारात्मक स्थितीत विराजमान असतो त्यांना शिक्षण व कलेची आवड असते असे मानले जाते. ही लोकं श्रद्धाळू असतात तसेच त्यांना एखादी बाब शोधून काढणे फार आवडते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२३ मध्ये धनु राशीची शनी साडेसातीतून मुक्ती कधी होणार?

येत्या नववर्षात धनु राशीत अनेक ग्रहांचे गोचर होणार आहे मात्र सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे येत्या जानेवारीतच धनु राशीला शनीच्या साडेसातीतून मुक्ती मिळणार आहे. १ जानेवारी २०२३ ला धनु राशीत सूर्य व बुध ग्रहाच्या युतीने बुधादित्य राजयोग तयार होत आहे. तर शनि व शुक्र आपल्या राशीत दुसऱ्या स्थानी स्थिर आहे. चतुर्थ स्थानी गुरु ग्रह तर पंचम स्थानी राहू व चंद्राची युती तयार झाली आहे. सहाव्या भावी मंगळ व ११ व्या स्थानी केतू स्थिर आहे. २०२३ मध्ये शनिदेव आपल्या कुंडलीत गोचर करून आपल्याला साडेसातीतून मुक्ती देतील. येणारं नवीन वर्ष तुमच्या राशीसाठी कसे जाणार? आर्थिक, वैवाहिक व आरोग्याची स्थिती कशी असणार हे जाणून घेऊयात..

Yearly Horoscope 2023 : जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्याचं वार्षिक राशीभविष्य; जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसं असणार आगामी वर्ष

२०२३ मध्ये धनु राशीला धनलाभाची मोठी संधी

वैदिक ज्योतिष शास्त्राच्या माहितीनुसार साडेसातीतून मुक्ती होताच फक्त २०२३ हे वर्षच नव्हे तर २०२५ पर्यंत आर्थिक लाभ होण्याची मोठी संधी आहे. आपल्याला नशिबाची साथ लाभेल. शनीदेव आपल्या भाग्याचे व गुरु ग्रह आपल्या लाभाचे रक्षण करणार आहेत. यामुळेच आपल्याला येत्या काळात प्रचंड धनलाभ होऊ शकतो. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी येणारे वर्ष लाभदायी ठरू शकते. शुभ प्रसंगी खर्च होऊ शकतो पण यामुळे तुमच्या बजेटवर वाईट परिणाम होणार असे चिन्ह नाही. येत्या काळात वाहन व प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत.

२०२३ मध्ये धनु राशीचे वैवाहिक जीवन कसे असणार?

येत्या काळात आपल्याला प्रेमाचा अनुभव घेता येऊ शकतो. जर आपण सिंगल असाल तर लवकरच आयुष्यात कोणीतरी नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. एप्रिल ते डिसेंबर या काळात आपल्या राशीत पंचम स्थानी गुरु ग्रह विराजमान असणार आहे. आपल्याला जोडीदाराच्या रूपात प्रचंड लाभ होऊ शकतो. एप्रिल नंतर तुमच्या नशिबाला वेगळीच कलाटणी मिळू शकते. गुरूच्या कृपेने येत्या वर्षात नव्या पाहुण्याचे म्हणजेच संततीप्राप्तीचे सुद्धा योग आहेत.

हे ही वाचा<< धन राजयोग बनल्याने ‘या’ ४ राशी होणार भरपूर श्रीमंत? २०२३ सुरु होताच ‘या’ रूपात बक्कळ धनलाभाची संधी

२०२३ हे वर्ष धनु राशीच्या विद्यार्थ्यांसाठी कसे असणार?

२०२३ हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी शुभ ठरू शकते. मार्च नंतर निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी तयारीत असणे आवश्यक ठरेल. तुम्हाला येत्या वर्षात शिक्षणासह काम करून दुहेरी लाभ मिळवता येऊ शकतो. तुम्ही एखाद्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवू इच्छित असाल तर तुमच्या प्रयत्नांना यश लाभण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा<< मार्च २०२३ पर्यंत ‘या’ ६ राशी होणार श्रीमंत? ३० वर्षांनी शनि व सूर्य एकत्र आल्याने प्रचंड धनलाभाची संधी

२०२३ मध्ये धनु राशीचे आरोग्य कसे असणार?

वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासक सांगतात की, २०२३ मध्ये धनु राशीच्या मंडळींचे आरोग्य स्थिर राहणार आहे. मुळात शनिदेव आपल्यावर खुश असल्याने आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल. राहू ग्रह आपल्या राशीच्या चतुर्थ भावात प्रवेश करताच थोड्या संसर्गाची लागण होण्याची शक्यता आहे त्यामुळे एप्रिल ते सप्टेंबर या काळात थोडे सतर्क राहा.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani sadesati effect ends on dhanu rashi in 2023 can get more money yearly horoscope of sagittarius zodiac astrology svs