Shani Transit Till 2025: तब्बल ३० वर्षांनी शनिदेव स्वराशीत स्थिर झाले आहेत. या गोचराने काही राशींच्या कुंडलीतून शनीची महादशा व साडेसाती तसेच धैय्या (अडीच वर्ष टिकणारा प्रभाव) संपुष्टात आला आहे. तर ज्योतिष तज्ज्ञांच्या माहितीनुसार पुढील अडीच वर्ष शनिदेव ज्या राशीत स्थिर असणार आहेत, शनिदेव हे कर्मदेवता म्हणून ओळखले जातात, परिणामी २०२५ पर्यंत त्यांचा प्रभाव ज्या राशीवर असेल त्यांना कर्माचे फळ द्विगुणित होऊन मिळू शकते. शनीच्या या स्थितीचा १२ राशींवर पुढील अडीच वर्ष म्हणजेच साधारण २०२५ पर्यंत नेमका काय परिणाम होऊ शकतो हे पाहूया..

२०२५ पर्यंत १२ राशींच्या भाग्यात काय बदल होणार?

मेष (Aries Zodiac)

शनी अकराव्या अर्थात लाभ स्थानात येत आहे. हा शनी पुढील अडीच वर्ष आपल्याला उत्तम साथ देईल. उद्योगधंद्यात राजकारणात पुढे येण्याची संधी प्राप्त करून देईल. नवीन परिचय, नवीन गाठी भेटीतून होणारा आनंदाचा स्पर्श मनाला उभारी देईल. जागोजागी मदतीचे हात पुढे येतील. त्यातूनच आपणास संयम सावधानता आणि विनय या गुणांची खऱ्या अर्थाने ओळख होईल. इतकेच नव्हे तर हे आयुष्यभराचे मार्गदर्शक ठरतील.

Surya transit in kumbh
पुढील २८ दिवसानंतर सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख
Makar Sankranti 2025 Puja Time and Significance in Marathi
Makar Sankranti 2025: १४ जानेवारी रोजी साजरी केली जाणार मकर संक्रांत; जाणून घ्या संक्रांतीचा पुण्य काळ, तिथी आणि महत्त्व

वृषभ (Taurus Zodiac)

पुढील अडीच वर्ष आपल्या दशम स्थानात शनीचे आगमन खूप यशदायक ठरेल. पण व्यवहार आणि भावना यांचे समीकरण जपा. पैशाचा अपव्यय टाळा. उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या निर्णय क्षमतेचा उपयोग मोलाचा ठरेल. मात्र कौटुंबिक जीवनांत बद्धपणे वागू नका. त्यातून जीवनांतील आनंद हरवेल. सारे काही समजुतीने घेणे हिताचे ठरेल.

मिथून (Gemini Zodiac)

आपल्या नवम स्थानात कुंभेचा शनी आपल्या भाग्य स्थानात आहे. शनीमुळे उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या विचारांचे व सल्ल्याचे स्वागत होईल. धर्मादाय कामात सार्वजनिक कामात आपला सहभाग मोलाचा ठरेल. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. शारिरीक ताकदीपेक्षा मनाचे बळ खूप मोठे असते. अशावेळी आपली खरी मानसिकता आपल्या जिभेवर घोळत असते. त्यामुळे विचारपूर्वक बोलणे हिताचे ठरेल.

कर्क (Cancer Zodiac)

कर्क राशीला शनी आठवा येत आहे, पण तो कुंभ राशीत असल्यामुळे संकटावर मात करण्याची हिंमत जरूर येईल. सार्वजनिक जीवनांत आपले हसे होऊ नये यासाठी लोक प्रवाहाच्या विरोधात बोलणे. पुरोगामी असल्याचा आव आणणे अतिस्पष्ट बोलून वादविवादाला विकृत स्वरुप देणे टाळा. परंतू हा शनी एप्रिलनंतर गुरुच्या शुभयोगात येत असल्याने खूपशी स्थिती बदलेल.

सिंह (Leo Zodiac)

सिंह राशीला शनी सप्तम स्थानातून जात आहे. उद्योगधंद्यात भागीदारी, कौटुंबिक सौख्यात अडचणी येतील. पण कुंभेतील स्वगृहीच्या शनीमुळे यातून उत्तम बचाव होईल. मुख्य म्हणजे एप्रिलनंतर होणारा गुरू सहवास खूप मदतीचा ठरेल. या काळात स्वमनाशी होणारा संवाद कठीण समस्याचे रुप साधे सोपे करील. आरोग्य सांभाळा पोटाचे विकार आजार यासाठी पथ्य पाणी आवश्यक ठरेल.

कन्या (Virgo Zodiac)

कन्या राशीला शनी षष्ठात नी तो ही स्वगृहीचा त्यामुळे कधी कधी विरोधीपक्षामुळेच आपला पराक्रम जगाला दिसून येतो. राजकारणात सामाजिक कार्यात उत्तम यश लाभेल. लोकाभिमुख होण्याची उत्तम संधी लाभेल. जमीन शेती खरेदी विक्रीत विशेष लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. मात्र भावना आणि व्यवहार याचे गणित खूप चातुर्याने सांभाळा. थोरा -मोठ्याच्या भेटीतून नव्या कल्पनांना चालना मिळेल. त्यात उत्कर्षाची नवीन दिशा लाभेल.

तूळ (Libra Zodiac)

या राशीला शनी पाचवा येत आहे. तूळ- कुंभ या दोन्ही वायूंनी बौद्धीक राशी त्यामुळे विज्ञानशाखेच्या लोकांना या अडीच वर्षात उत्तम संधी प्राप्त होतील. नवे संशोधन नवे विचार पुढे येतील. प्रगतीशील कामे होतील. समाजकार्यात, राजकारणात संधी प्राप्त होतील. शेअर्स, म्युच्युअल फंड यात केलेली गुंतवणूक फायदेशील ठरेल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणात विशेष प्रगती दिसून येईल.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

कुंभेचा शनी वृश्चिक राशीला चतुर्थ स्थानात येतो. कौटुंबिक सुखात होणारे मतभेद पंचमातील गुरु व षष्ठातील राहू वाढू देणार नाहीत पण अति हट्टीपणा हेकेखोरपणाला मुरड घालण्यातच आपले हित आहे. या मंगळाच्या वृश्चिक राशीला शनीचा कायम विरोध राहील. गुरुचे षष्ठातील आगमन २१ एप्रिल २०२३ रोजी होत आहे. त्यातून शनीशी होणारा शुभयोग कौटुंबिक कलह दूर करील. स्थावर इस्टेट मालमत्ता शेती वाडीच्या खरेदीविक्रीतून फायदा होईल. कोर्टकचेरी निकालात यश लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

धनु (Sagittarius Zodiac)

कुंभ राशीचा शनी धनु राशीच्या पराक्रमात (तृतीयस्थानात) जात आहे आणि त्याच बरोबर धनु राशीची साडेसाती संपली आहे ही एक लक्षणीय बाब आहे हा शनी स्वराशीत शुभदायक आला आहे. त्यामुळे नोकरी उद्योगधंद्यात नवीन संधी चालून येतील. प्रवासाचे योग येतील. आर्थिक बाबतीतली उलाढाल समाधानकारक घडेल. जुन्या समस्या संपुष्टात येतील. एकूण खूप दिवसांनी आलेला हा सुखद काळ आनंद देईल. पण मात्र या सर्वात कुठेही भावनेचा अतिरेक टाळा. भरवसा अतिविश्वास ठेवू नका. स्वत: सक्रीय रहा. व स्वत:वर नियंत्रण ठेवा.

मकर (Capricorn Zodiac)

शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करीत आहे. शनी धनु व मकरेत असताना जातकाला साडेसातीचा खूप त्रास होतो, पण शनी कुंभ राशीला प्रवेश करताच सारे चित्र बदलते. शनी स्वगृहीचा धनस्थानात त्यामुळे उद्योगधंद्यात नोकरीत स्थिरता लाभते. मानसन्मानाचे योग येतात. कामाचे विशेष कौतुक होते. पैसा गुंतवल्याने बऱ्यापैकी फायदा होतो. शेअर्स उद्योगातील गुंतवणूक खूप महत्त्वाची ठरते. त्यात गुरुचा पराक्रमातील सहवास अधिक प्रोत्साहीत करून सुखाचे दिवस दाखवतो. मात्र अति दगदग टाळा.

कुंभ (Aquarius Zodiac)

स्वराशीत कुंभेत शनी येण्याआधी मकरेतील शनीमुळे साडेसातीचा कुंभ राशीला अडीच वर्ष नक्कीच त्रास झाला असेल. पण आता प्रत्यक्षात शनी कुंभ राशीत प्रवेश करीत आहे आणि हा शनी खूप लाभदायक ठरेल. बुद्धी प्रयत्न आणि श्रम यातून या राशीला उत्तम यश प्राप्ती होईल. या लोकांना शनीचा संयम शोधकवृत्ती नी उ्दयोगबुद्धी नैसर्गिक प्राप्त होईल. त्यामुळे आर्थक बाजू उत्तम राहील. त्यात धनस्थानात स्वराशीचा गुरु बोलण्यातून वागण्यातून आपली विद्वत्ता प्रदर्शित करेल. तर पराक्रमातील राहूची या शनीला उत्तम साथ लाभेल. त्यामुळे कुंभ राशीला हे वर्ष आनंदी व सुखाचे जाईल.

हे ही वाचा<< १४ एप्रिलला बुधादित्य राजयोग बनल्याने ‘या’ राशींना बक्कळ धनलाभ होणार? ‘या’ मार्गे अनुभवा अच्छे दिन

मीन (Pisces Zodiac)

मीन राशीच्या व्ययात शनी त्यामुळे मीन राशीला पहिली साडेसाती चालू होईल पण शनीचे स्वराशीतील भ्रमण फारसे त्रासदायक ठरणार नाही पण काळजी घेणे आवश्यक ठरेल. अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल त्यात होणारी आवक गोठेल व त्यातून चिंता प्राप्त होईल पण मूळात गुरु मीन राशीत स्वगृही असल्यामुळे खूपशा घटनांचे विपरीत परिणाम फारसे होणार नाहीत. तरी पैशाची बचत करून पैसे जपून वापरणे हा नियम स्वत:ला लावून घ्या. राजकारणात, सामाजिक कार्यात मोठ्या जबाबदाऱ्या घेऊ नका. वचने आश्वासन देणे टाळा.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader