ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. ग्रहाने राशी बदलली की त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. त्यामुळे वैदीक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराला महत्त्व आहे. चंद्र ग्रह दर सव्वा दोन दिवसांनी रास बदलतो. तर शनि ग्रह अडीच वर्षांनी रास बदलतो. यामुळे कधी कधी ग्रहांचा एकाच राशीत संयोग पाहायला मिळतो. शनि ग्रह अडीच वर्षांनंतर म्हणजेच २९ एप्रिल २०२२ रोजी राशी बदल करणार आहे. शनि ज्या राशीत प्रवेश करतो त्या राशीसह मागच्या पुढच्या राशीला साडेसाती सुरु असते. आता शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा तर मीन राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होणार आहे. तर धनु राशीचा साडेसातीपासून सुटका होणार आहे. तर तूळ आणि मिथून राशीला शनिची अडीचकी सुरु आहे. त्यांनाही २९ एप्रिलनंतर दिलासा मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. त्यामुळे सुमारे ३० वर्षांनी शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाधीशाचा दर्जा आहे. म्हणजे शनि ग्रह कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे या संक्रमणाचा सर्व राशींवर प्रभाव पडेल, परंतु हा राशी बदल तीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. जाणून घ्या कोणत्या आहेत या तीन राशी.

मेष: शनीचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या अकराव्या भावात प्रवेश करणार आहेत, या स्थानाला लाभ आणि उत्पन्नाचे स्थान म्हटले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. तसेच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही या वेळी व्यवसायात नवीन करार करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ते यावेळी करू शकता.

Budh Gochar: धनदात्या शुक्राच्या राशीत बुध करणार प्रवेश, तीन राशींसाठी ‘अच्छे दिन’

वृषभ: तुमच्या संक्रमण कुंडलीत शनिदेव दहाव्या भावात भ्रमण करतील. या स्थानाला नोकरीचे स्थान म्हणतात. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. यासोबतच शनिदेव राशी बदलताच तुमच्या कार्यशैलीत सुधारणा होऊ शकते. वृषभ राशीवर शुक्राचे राज्य आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव आणि शुक्रदेव यांच्यात मैत्रीची भावना आहे.

धनु: शनिदेवाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण शनि ग्रह तुमच्या तिसऱ्या स्थानात प्रवेश करेल. या स्थानाला पराक्रम आणि भावा-बहिणीचं स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुमच्या पराक्रमात वाढ होण्याची चिन्हे आहेत. यासोबत गुप्त शत्रूंचाही यावेळी नाश होईल. तसेच शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करताच धनु राशीच्या लोकांना शनि साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तसेच, तुम्हाला कोणत्याही जुन्या आजारापासून आराम मिळू शकतो.