Shani Sadesati: ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला कर्म फळदाता आणि न्यायाचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. शनी नवग्रहातील ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी शनीला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. शनीने जानेवारी २०२३ मध्ये कुंभ राशीमध्ये प्रवेश केला होता आणि अडीच वर्ष तो याच राशीमध्ये राहिल्यानंतर शनीने २९ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ०१ मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश केला. जो पुढील अडीच वर्ष म्हणजे ८ ऑगस्ट २०२९ पर्यंत या राशीमध्ये राहिल. तसेच मीन राशीत शनीचा प्रवेश होताच. मेष राशीचीही साडेसाती सुरू झाली आहे. सध्या मेष राशीसाठी शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. तर मीन राशीसाठी दुसरा टप्पा आणि कुंभ राशीसाठी तिसरा टप्पा सुरू आहे.

शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मेष आणि मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांना समोरे जावे लागेल. तर कुंभ राशीला काही सुखद परिणाम अनुभवायला मिळतील.

शनीच्या साडेसातीचा प्रभाव

कुंभ

सध्या कुंभ राशीसाठी शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडचणी दूर होण्यात मदत होईल. कामातील अडथळे दूर होतील. सकारात्मक बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. साडेसातीचा मागील काळ खूप अडचणींचा होता, त्याच्या तुलनेत येणारा काळ तुमच्यासाठी खूप लाभदायी असेल.

मीन

सध्या शनी मीन राशीतच असल्यामुळे मीन राशीसाठीच्या व्यक्तींना आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांना समोरे जावे लागेल. या काळात आर्थिक, मानसिक, शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागेल. कामात अडथळे जाणवतील. मतभेद होतील, त्यामुळे या काळात चांगले कर्म करून मनात सर्वांविषयी निस्वार्थ भाव ठेवा. या काळात शनीदेव तुमच्याकडून खूप कठोर परिश्रम करून घेतील. अशा प्रकारच्या आव्हानांत हसत-हसत समोरे जा.

मेष

मेष राशीसाठी शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला असून हळूहळू कामात अडथळे निर्माण होण्यास सुरूवात होईल. मन शांत ठेवून कोणतेही काम करा. वैवाहिक आयुष्यात किंवा प्रेम संबंधांमध्ये चुकीच्या गैरसमजांमुळे कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये खूप मेहनत घ्यावी लागेल. कष्टाचे फळ मिळण्यात अडचणी येतील. अनावश्यक खर्च वाढतील.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)