Shani Sadesati : शनि हा ग्रह कर्मानुसार फळ देतो त्यामुळे शनिला कर्मदाता म्हणतात. शनिच्या प्रत्येक चालीचा राशीचक्रातील बारा राशींवर परिणाम पडतो. शनिच्या साडेसातीला सर्वच लोक घाबरतात.
शनि जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला साधारणत: अडीच वर्षाचा कालावधी लागतो. जेव्हा शनि तुमच्या चंद्र राशीपासून १२ व्या घरात प्रवेश करतो तेव्हा तुमची साडेसाती सुरू होते आणि जेव्हा शनी तुमच्या चंद्र राशीपासून दुसरे घर सोडून तिसऱ्या घरात प्रवेश करतो तेव्हा तुमची साडेसाती संपते. (Shani Sadesati when will mesh rashis shani sadesati will start people need to be careful)

हेही वाचा : जुलै महिन्यात ‘या’ ५ राशींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? चार मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, कुणाला होणार फायदा?

मेष राशीची साडेसाती केव्हा सुरू होईल?

शनि सध्या कुंभ राशीमध्ये विराजमान आहे. आता शनिची साडेसाती मकर, कुंभ आणि मीन राशीवर सुरू आहे. शनि हा सर्वात हळूवार चालणारा ग्रह आहे. २०२५ मध्ये मार्च महिन्यात २९ तारखेला शनि गोचर करणार आहे. शनि कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. २०२५ हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी कठीण राहणार. शनिच्या राशी परिवर्तनामुळे मेष राशीच्या लोकांना वर्ष २०२५ मार्च पासून शनिची साडेसाती सुरू होईल.

मेष राशीच्या लोकांना २०२५ मध्ये सावधगीरीने राहणे आवश्यक आहे. २०२५ या वर्षामध्ये शनिच्या चालीचा मेष राशीच्या लोकांवर परिणाम दिसून येईल. शनिची साडेसाती खूप कष्टदायी असते. याच कारणामुळे ज्या लोकांवर साडेसाती असते त्यांना अडचणी आणि समस्यांचा सामना करावा लागतो.

हेही वाचा : तब्बल १८ महिन्यांनतर होईल मंगळ आणि चंद्राच्या युती! ‘महालक्ष्मी राजयोगा’मुळे या राशींचे नशीब चमकणार, धन-संपत्तीमध्ये होईल वाढ

कोणती काळजी घ्यावी?

शनिची साडेसाती सुरू झाल्यानंतर मेष राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागेल. २०२५ मध्ये या लोकांना कोणतेही काम करताना काळजीपूर्वक करावे लागेल. या दरम्यान या लोकांनी पैशांचे व्यव्हार करू नये. पैसा गरज पडेल तिथेच खर्च करावा. या दरम्यान या लोकांनी कोणत्याही प्रकारचे वाद विवादांपासून दूर राहावे. या दरम्यान या राशीच्या लोकांनी कोणावरही विश्वास ठेवू नये. कोणतेही काम विचारपूर्वक करावेत.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)