Shani Shukra Yuti Rashi Parivartan Mahashivratri 2024: येत्या ८ मार्चला महाशिवरात्रीची तिथी जुळून आली आहे. भगवान शंकराच्या भक्तांसाठी हा दिवस अत्यंत खास असतो, पण यंदा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शिवभक्तांना ८ मार्चच्या आधीच प्रचंड मोठा लाभ होऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे धन-वैभव, सुख- समृद्धी व प्रेमाचा कारक मानला जाणारा शुक्र ७ मार्चला सकाळी शनीच्या स्वामित्वाच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनी व शुक्र यांच्यातील मैत्रीपूर्ण नाते व दोन अत्यंत बलाढ्य ग्रहांच्या युतीने महाशिवरात्रीच्या आधीच १२ राशींच्या कुंडलीत अचानक बदल घडून येऊ शकतात. काही राशींसाठी हे बदल अतिशय शुभ ठरण्याची चिन्हे आहेत. या मंडळींना आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण करण्याची इतकेच नव्हे तर धनलक्ष्मीच्या आशीर्वादाने करोडपती होण्याची सुद्धा नामी संधी ७ मार्चपासून मिळू शकते. हे वर्ष तुमच्यासाठी आठवणींचे ठरेल इतके बदल घडवणारा हा शुभ योग असू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्र व शनीची युती नेमकी होतेय कधी?

वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार ७ मार्च २०२४ ला सकाळी १० वाजून ३३ मिनिटांनी शुक्राचा कुंभ राशीत प्रवेश होणार आहे. मागील दीड वर्षांपासून शनी देव स्वराशीतच विराजमान असणार आहेत. शुक्राच्या या प्रवेशाने अस्ताला गेलेल्या शनीच्या शक्तीत वाढ होऊ शकते. तसेच सौंदर्य व रचनात्मक काही बदल घडून येऊ शकतात.

कुंभ राशीत शुक्र येताच ‘या’ राशींच्या नशिबाचे टाळे उघडणार

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

तूळ राशीच्या गोचर कुंडलीत शनी व शुक्राची युती पाचव्या स्थानी प्रभावी असणार आहे. याचा मोठा फायदा तुमच्या व्यक्तिमत्वाला होऊ शकतो. तुमच्यातील भीती निघून जाईल अशी एखादी घटना घडू शकते. बोलण्यात व वागण्यात तेज येऊ शकते. कामाच्या ठिकाणी आपल्या कष्टाचे कौतुक केले जाईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभल्याने पद व पगार वाढ होऊ शकते. एखाद्या नव्या कामाची सुरुवात होऊ शकते ज्यामध्ये तुम्हाला तुमचे कलागुण दाखवण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुद्धा सुधारू शकते. मानसिक शांती लाभल्याने हा कालावधी आपल्याला समाधानाकडे नेणारा असेल.

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

शनी व शुक्र कुंभ राशीच्या लग्न भावात जागृत असणार आहेत. या कालावधीत आपल्याला आई- वडिलांची साथ मिळू शकते. वाडवडिलांच्या जुन्या संपत्तीतून लाभ होण्याची चिन्हे आहेत. जुन्या मित्र- मैत्रिणीशी गाठी भेटी होऊ शकतात. नवनवीन संधी हाती आल्याने थोडा संभ्रम वाढू शकतो मात्र वरिष्ठांच्या सहकार्याने व सल्ल्याने योग्य निर्णय घ्याल. या काळात धनसंचय करणे हिताचे ठरेल. आर्थिक मिळकतीचे मार्ग वाढतील मात्र गुंतवणूक व खर्चाचे आकडे नीट जुळवावे लागतील. वैवाहिक आयुष्यात आनंद प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मानसिक ताण-तणाव व आजारातून मुक्ती मिळू शकते.

हे ही वाचा<< ३१ मार्चपर्यंत ‘या’ राशी तन-मन-धनाने होतील श्रीमंत; होळी आधी शनी, सूर्यासह ४ ग्रहांचे गोचर, १२ राशींना कसा जाईल मार्च?

मीन रास (Pisces Rashi Bhavishya)

शुक्र कुंभ राशीत येताना मीन राशीच्या गोचर कुंडलीत बाराव्या स्थानी प्रभावी असणार आहे. उर्वरित वर्षभरात आपल्याला करिअरच्या दृष्टीने मोठा लाभ होण्याची चिन्हे दिसत आहेत. याचे एक माध्यम ठरेल आपला एखादा जुना व प्रचंड कष्ट घेऊन उभा केलेला प्रकल्प किंवा उपक्रम यशस्वी होऊ शकतो ज्यातून मोठा धनलाभ संभवतो. तसेच तुम्हाला गुंतवणूकदारांकडून बळ मिळू शकते ज्यामुळे खर्च कमी होऊन आर्थिक मिळकत वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या लक्ष्मीला योग्य तो मान- सन्मान दिल्यास व मुळात वृद्धीसाठी स्वतः गुंतवणुकीवर भर दिल्यास आपल्याला भविष्यात सुद्धा यामुळे लाभ होऊ शकणार आहे. समाजातील आपले स्थान भक्कम होईल तसेच नाते संबंधांमध्ये सुद्धा सुधारणा होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani shukra active mode 24 hours before maha shivratri these rashi will be blessed by mahadev rich life money power astrology svs