shani shukra budh surya rahu and moon yuti: ज्योतिषशास्त्रानुसार, २०२५ या नव्या वर्षात अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन होईल. या राशी परिवर्तनासह ग्रह शुभ किंवा अशुभ योगदेखील निर्माण करतील. त्यामुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. मार्च २०२५ मध्ये मीन राशीमध्ये शनी, बुध, सूर्य, राहू आणि चंद्र हे ग्रह एकत्र विराजमान असतील. ज्यामुळे षडग्रही योग निर्माण होईल. ग्रहांची ही युती खूप शुभ मानली जाते. या योगाच्या शुभ प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल.
षडग्रही योग घेऊन येणार आनंदाचे क्षण
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी मीन राशीतील षडग्रही योग खूप चांगले बदल घडवून आणणारा ठरेल. या काळात तुम्हाला हवं ते मिळवाल. तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. आयुष्यात काही अडचणी येतील. पण तुम्ही त्या दूर कराल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाठीदेखील हा शुभ योग खूप अनुकूल सिद्ध होईल. हा योग खूप सकारात्मक बदल घेऊन येईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आनंदी वार्ता कळतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होईल.
हेही वाचा: ४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; गुरूची चाल देणार पैसा आणि प्रतिष्ठा
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींनाही हा योग खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल. मीन राशीतील षडग्रही योग कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. भावंडासोबतते नाते अधिक घट्ट होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)