Shukra Chandra Yuti/ Kalatmak Rajyog 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह निश्चित वेळेवर राशी परिवर्तन करत असतो. जेव्हा दोन ग्रह एका रांगेत येतात किंवा त्यांच्या गोचर कक्षा एकमेकांसह जुळतात तेव्हा त्यांची युती निर्माण होत आहे. या युतीतून अनेकदा शुभ राजयोग निर्माण होत असतात. काही दिवसांपूर्वीच प्रेमळ ग्रह शुक्र व चंद्राची युती होऊन कलात्मक राजयोग निर्माण झाला आहे. हा योग तीन राशींच्या भाग्योदयाचे संकेत घेऊन आला आहे. विशेषतः कामाच्या बाबत प्रचंड प्रगती घेऊन येणारा हा राजयोग तुम्हाला धनलाभ मिळवून देत श्रीमंतांचे आयुष्य जगण्याची संधी देऊ शकतो. याच कालावधीत शनी सुद्धा मार्गी होऊन शश महापुरुष राजयोग बनवणार आहेत. या दोन्ही राजयोगांचा एकत्रित प्रभाव तीन राशींच्या नशिबाला कलाटणी देऊ शकतो. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांना कोणते लाभ होऊ शकतात हे पाहूया..
कलात्मक राजयोग व शनीचा आशीर्वाद, ‘या’ राशींच्या कुंडलीत दिसतेय श्रीमंती
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
कलात्मक योग मेष राशीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतो. या कालावधीत आपल्याला भौतिक सुख म्हणजेच वाहन किंवा प्रॉपर्टीची खरेदी करण्याची संधी मिळू शकते. करिअरमध्ये बदलाचे संकेत आहेत. आपल्याला कामाच्या ठिकाणी येत असणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. आईच्या रूपात धनप्राप्तीची संधी आहे. तुमच्या आयुष्यातील स्त्रियांची भक्कम साथ आपल्याला लक्ष्मीकृपा मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
कलात्मक राजयोग हा आपल्या कुंडलीत सातव्या स्थानी तयार होत आहे. विवाहित मंडळींसाठी हा कालावधी शुभ सिद्ध होऊ शकतो. जोडीदारासह ताळमेळ साधता येईल. प्रवासाचे योग आहेत. संगीत. मीडिया व कला विश्वाशी संबंधित कामकाजात गुंतलेल्या मंडळींना या कालावधीत प्रचंड लाभाचे संकेत आहेत. व्यवसाय करण्यात आपले हित आहे, गुंतवणुकीच्या संधी दवडू नका. शेअर्स उद्योगातील गुंतवणूक खूप महत्त्वाची ठरते. त्यात शुक्राचा पराक्रमातील सहवास अधिक प्रोत्साहीत करून सुखाचे दिवस दाखवू शकतो. मात्र अति दगदग टाळा. आर्थिक सल्लागार असल्यास नक्कीच चर्चा करा.
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
नोकरी व्यवसायात वरिष्ठ मंडळींचे पाठबळ मिळेल. करियरमध्ये आगेकूच कराल. मुलामुलींना अनुरूप जोडीदार मिळेल. विवाहित मंडळी आपल्या सहजीवनाचा आनंद घेतील. गुंतवणूकदारांनी मोठी जोखीम पत्करू नये. घर, प्रॉपर्टी, मालमत्ता या संबंधात कोर्टाचा निर्णय आपल्या हिताचा असेल. नातेवाईकांच्या सांगण्यावरून एखाद्या बद्दलची आपली मते ठाम करू नका. सिंह राशीच्या मंडळींच्या आयुष्यात येत्या काळात अनेक बदल घडणार आहेत त्यासाठी स्वतःला तयार करण्याकडे लक्ष द्या.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)