Shani- Shukra Yuti 2023: कर्मदाता शनिदेव हे कलियुगातील दंडाधिकारी मानले जातात. शनी हा मूळ कुंभ राशीचा स्वामी असला तरीही ते प्रत्येक राशीला त्यांच्या कर्मानुसार फळ देत असल्याचे मानले जाते. २०२३ च्या सुरुवातीला शनिदेव स्वतःच्या राशीत म्हणजे कुंभ मध्ये स्थिर झाले आहेत. जेव्हा कोणताही ग्रह आपल्या मूळ त्रिकोण राशीत असतो तेव्हा त्याची शक्ती प्रचंड वाढते. अशातच काही दिवसांपूर्वी शनिदेव दशमी स्थितीत आले आहेत. याच वेळी शुक्र देव सुद्धा वृषभ राशीत स्थिर झाले आहेत. शनीची दशमी स्थिती व शुक्राचे सप्तमातील स्थान यामुळे अनेक राजयोग तयार होत आहेत. मालव्य राजयोग व नवपंचम राजयोगाने तीन राशींना बक्कळ धनलाभाचे योग दिसत आहेत. महिन्याभरात या राशी कोट्याधीश होण्याची संधी मिळणार आहेत.
शनी- शुक्र युतीने ‘या’ राशी होतील कोट्याधीश?
वृषभ रास (Vrusbh Rashi)
वृषभ राशीच्या कर्म स्थानी शनिदेव गोचर करत आहेत. ही दशम दृष्टी तुमच्या लग्नजीवनात काही उलाढाल घडवून आणू शकते. तुम्ही कामात व वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ मिळवून अधिक लाभ होऊ शकतो. नोकरदार मंडळींना पगारवाढीची संधी मिळू शकते पण तत्पूर्वी तुम्हाला तुमचे काम सिद्ध करावे लागेल. शिवाय तुम्ही तुमचे काम कसे समोरच्याला दाखवून देता हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे अन्यथा तुमच्या कामाचे साधे श्रेय सुद्धा तुमच्यापासून हिरावले जाऊ शकते.
सिंह रास (Sinha Rashi)
सिंह राशीच्या मंडळींना शनिदेवाची दशमी दृष्टी व शुक्राच्या मालव्य राजयोगाने प्रचंड लाभ होण्याची शक्यता आहे. शिक्षण व बँकिंग क्षेत्रातील कामात प्रचंड लाभ होऊ शकतो. तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असल्यास हा काळ अत्यंत फायद्याचा ठरू शकतो. तुम्ही जर नवीन कामे सुरु केले तर तुम्हाला प्रचंड मोठा धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला जुने अनुभव गाठीशी ठेवायचे आहेत पण त्यामुळे इतरांवर अविश्वास दाखवू नका.
हे ही वाचा<< १३० वर्षांनी पौर्णिमेला ग्रहांचा ‘महासंयोग’ बनल्याने ‘या’ राशी होतील लखपती? ‘या’ रूपात मिळू शकते लक्ष्मीची साथ
कुंभ रास (Kumbh Rashi)
शनी मुळात कुंभ राशीत स्थिर असल्याने हा काळ साडेसातीचा असूनही तुमच्यासाठी लाभदायक असू शकतो. मालव्य राजयोग बनून तुमच्या राशीला प्रेम अनुभवण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात अधिक यश लाभू शकते. तुमच्या वडिलांच्या रूपात प्रचंड लाभ होऊ शकतो. शेअर बाजार व प्रॉपर्टीच्या गुंतवणुकीसाठी उत्तम वेळ आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)