Amavasya Sarvarth Siddhi Yog Astrology: पोर्णिमेइतकंच महत्त्व अमावास्येला सुद्धा असतं. पण काही महिन्यांमधील अमावस्या तिथी या विशेष असतात. जसे की आजपासून सुरु होणारी श्राद्ध अमावस्या. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येची तिथी आज ७ मे ला सुरु होणार असून उद्या ८ मे ला संपणार आहे. या अमावस्येलाच यंदा योगायोगाने तब्बल तीन शुभ राजयोग जुळून आलेले आहेत. ८ मेच्या दिवशी अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग व शोभन योग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे तिन्ही योग राशीचक्रातील तीन राशींच्या भरभराटीचे माध्यम ठरू शकणार आहेत. या दिवशी नेमक्या कोणत्या राशींना लाभ होऊ शकतो? अमावस्येची नेमकी तिथी कोणती व यादिवशी आपण काय करायला हवे याविषयी वैदिक ज्योतिषशास्त्र काय सांगते हे जाणून घेऊया ..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंचांगानुसार, आज ७ मे ला सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी अमावस्या तिथीचा प्रारंभ होणार असून उद्या ८ मे ला सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल. उदयतिथीनुसार अमावस्येचे व्रत हे ७ मे ला असणार आहे तर स्नान- दान हे ८ मेला करायचे आहे. आजची अमावस्या ही श्राद्ध अमावस्या किंवा दर्श अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. यादिवशी आपल्या पितरांना आवडीच्या पदार्थांचा नैवैद्य देण्याची सुद्धा पद्धत आहे. पितृपक्षाप्रमाणेच आजच्या दिवशी सुद्धा पितरांच्या शांतीसाठी व सद्गतीसाठी प्रार्थना केल्याने आपल्याला सुद्धा त्यांचा आशीर्वाद लाभतो असे मानले जाते.

अमावस्येला जुळून आलेल्या शुभ योगांनी ‘या’ ३ राशी होणार सुखी

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीच्या मंडळींसाठी आजचा व उद्याचा दिवस उत्तम लाभाची स्थिती निर्माण करू शकतो. विशेषतः करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकते. धनप्राप्तीसाठी आपल्या वाटेतील अडथळे दूर होतील. जीवनात सुख व समृद्धीचा अनुभव घ्याल. कुटुंबियांसह सुखाचे व आनंदाचे काही क्षण जगू शकाल.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

अमावास्येपासून वृषभ राशीचे दिवस बदलण्यास सुरुवात होईल. घरी- दारी नव्या पाहुण्यांचा प्रवेश होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या वाणीच्या बळावर मोठा फायदा होऊ शकतो. नकार देण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी लागेल. आरोग्यात सुधारणा होईल. काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याने एखादा जुना प्रश्न किंवा वाद सोडवता येईल. जमिनीच्या संबंधित प्रश्न सुटतील. वाडवडिलांच्या संपत्तीतून आपले जीवन सुकर होण्याची सुरुवात होईल.

हे ही वाचा<< भोलेनाथ आज शिवरात्रीपासून ‘या’ ४ राशींच्या डोक्यावर ठेवतील हात; ३० दिवस बरसणार कृपा, तन – मन – धनाची समृद्धी

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

कुंभ राशीच्या मंडळींना अमावस्या शुभ फळ देऊ शकते. नोकरीत पगारवाढ किंवा पदोन्नती होऊ शकते. नव्या कामाची सुरुवात करायला घाबरू नका. मागील काही दिवसांपासून चालू असलेला ताण- तणाव दूर होऊ शकतो. लक्ष्मी व विष्णूचा वरदहस्त आपल्या माथ्यावर असेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)