Shani Shukra Yuti 2024 : दैत्यांचा स्वामी शुक्र ग्रह दर २६ दिवसांनी त्याचे राशिचक्र बदलत असतो. शुक्राच्या राशीतील बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. शुक्र हा धन, समृद्धी, आनंद, आदर, आकर्षण आणि प्रेमाचा कारकही मानला जातो. त्यामुळे शुक्राच्या राशी बदलामुळे करिअर, व्यवसाय, शिक्षण, लव्ह लाईफ, वैवाहिक जीवन तसेच आर्थिक स्थितीवर परिणाम दिसून येतो. शुक्राने कोणत्याही ग्रहाशी संयोग केला तर त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. डिसेंबरच्या शेवटी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.जिथे शनि ग्रह आधीच स्थित आहे. अशाप्रकारे कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग होणार आहे. या दोन शक्तिशाली ग्रहांच्या संयोगामुळे अनेक राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईलच, शिवाय त्यांच्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येत प्रत्येत कामात त्यांना घवघवीत यश मिळू शकते. चला जाणून घेऊया शुक्र आणि शनीच्या संयोगाने कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द्रिक पंचांगनुसार शुक्र २८ डिसेंबर रोजी रात्री ११.४८ वाजता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. जिथे शनि ग्रह आधीच स्थित आहे.अशा स्थितीत ३० वर्षांनंतर कुंभ राशीमध्ये शनी आणि शुक्राचा संयोग होत आहे.

शनी शुक्राच्या संयोगाने या राशींच्या आयुष्यात येतील सोन्यासारखे दिवस

मेष

शुक्र आणि शनीचा संयोग मेश राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या काळात या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते तसेच भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरीही मिळू शकते. कामातही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. यश मिळण्याची अनेक शक्यता असू शकतात. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. तुम्हाला एकापेक्षा जास्त व्यवसाय करण्याची संधी देखील मिळू शकते. यातून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. आर्थिक स्थितीही चांगली राहील. तुमच्या अनेक दीर्घकाळ दडपलेल्या किंवा रखडलेल्या इच्छा आता पूर्ण होऊ शकतात. याद्वारे तुम्ही भविष्यासाठी बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.

वृषभ

शुक्र आणि शनीचा संयोग वृषभ राशीसाठी फलदायी ठरु शकतो.या काळात कुंभ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते तसेच भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्याबरोबरच मान-सन्मानात वाढ होईल.तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते.तुम्ही चमकदार कामगिरी कराल, ज्यामुळे तुम्ही सर्वांचे आवडते बनू शकता. आर्थिक स्थितीही चांगली राहील. यासह, मित्र किंवा कुटुंबासह सहलीचा प्लॅन होऊ शकतो, ही सहल तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक ठरु शकते. लव्ह लाईफ सुद्धा चांगली असेल. वैवाहिक जीवनात आनंद राहू शकतो. आरोग्य चांगले राहील. फक्त बदलत्या हवामानाबाबत थोडी काळजी घेण्याची गरज आहे.

Surya Gochar 2024: धनत्रयोदशीपूर्वीच फळफळणार ‘या’ राशींचे नशीब! सूर्याच्या नक्षत्रबदलाने मिळणार प्रचंड धनसंपत्ती अन् यश

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीचा संयोग देखील खूप शुभ ठरु शकतो. या काळात कर्क राशीच्या लोकांना नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. बेरोजगारांनाही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. पण पैसे खर्च करताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य चांगले राहील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani shukra yuti 2024 saturn and venus conjunction in kumbh rashi these zodiac sign will be happy and lucky get more money astrology horoscope sjr