Shani Shukra Yuti : ग्रह नक्षत्र वेळो वेळी आपली चाल बदलत असतात. ग्रह नक्षत्राची चाल बदलल्याने अनेकदा शुभ संयोग निर्माण होतात. अनेकदा शुभ संयोग निर्माण झाल्याने लाभदायक योग निर्माण होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र आणि शनिची युती दृष्टी योगचा संयोग निर्माण करत आहे.

कधी बनणार शुक्र शनिचा दृष्टी योग

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र शनिचा दृष्टी योग तीन दिवसानंतर गुरुवारी २५ एप्रिल रोजी निर्माण होईल. या दिवशी सकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी शुक्र शनि मिळून दृष्टी योग निर्माण करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र शनिचा हा योग अत्यंत लाभदायक ठरू शकतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र शनिचा हा दृष्टी योग २ दिवसानंतर गुरुवार २५ एप्रिलला निर्माण होणार. या दिवशी सकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी शुक्र शनि मिळून दृष्टी योग निर्माण करणार. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र शनिचा हा योग अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

वृषभ राशी

शुक्र आणि शनिची युती वृषभ राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायासाठी जबरदस्त लाभ देणारी ठरू शकते. यावेळी या लोकांना मनाप्रमाणे नोकरी मिळू शकते आणि प्रोफेशनल जीवनात मोठे यश मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होणार.व्यवसायात चांगला नफा मिळणार. अडकलेले धन संपत्ती परत मिळू शकते. थांबलेल्या योजना परत सुरू होऊ शकतात.

कर्क राशी

शुक्र आणि शनिची युती कर्क राशीच्या लोकांसाठी प्रेम आणि करिअरमध्ये शुभ संकेत घेऊन येणारी ठरणार. या दरम्यान खरं प्रेम मिळू शकते.कोणत्याही वरिष्ठांच्या मदतीने करिअरमध्ये बदल घडू शकतो. हे परिवर्तन आपल्या आयुष्यात सकारात्मकता वाढवणार. सुविधांमध्ये वाढ होईल आणि आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा आणखी उत्तम होईल. विशेष करून मीडियाशी जुळलेल्या लोकांना या वेळी चांगली संधी मिळू शकते.

तुळ राशी

तुळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र असतो जेव्हा शनिबरोबर तो युती करतो, तेव्हा यांच्या युतीने करिअरमध्ये अनेक सुधारणा दिसून येतात. या वेळी या लोकांना प्रमोशनमध्ये पगार वृद्धीचे योग दिसून येईल. तसेच एखादी नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीची संधी मिळू शकते. पितृ संपत्तीचा लाभ होऊ शकतो आणि कुटुंबाचे सहकार्य मिळू शकते.

मकर राशी

मकर राशीचे स्वामी शनि आहे आणि जेव्हा मित्र शुक्राबरोबर एकत्र येतात, तेव्हा ती वेळ अत्यंत शुभ असते. या लोकांना अशी नोकरी मिळू शकते ज्याची दीर्घ काळापासून हे लोक वाट पाहत आहे. सुख सुविधा वाढणार आणि या लोकांची आर्थिक स्थिती सुदृढ होईल या वेळी हे लोक चांगली बचत करतील. कुटुंबात सन्मान वाढेल आणि जोडीदाराबरोबरचे नाते अधिक गोड होईल.

कुंभ राशी

शुक्र आणि शनिची युती कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायद्याची ठरणार आहे. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल या लोकांना आवडती पोस्टिंग मिळू शकते. बॉसबरोबर या लोकांचे नाते सुधारू शकतात आणि याचा फायदा यांना मिळेल. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. एकत्र मिळून काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. घरात सुख सुविधा वाढणार. तसेच मानसिक संतुलनाबरोबर सुख समृद्धी वाढणार.

टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)