Shani Shukra Yuti 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदल करतो. ज्याचा परिणाम १२ राशींवर दिसून येतो. त्याचप्रमाणे नऊ ग्रहांपैकी कर्मफळ दाता शनि आणि राक्षसांचा गुरु शुक्र हे दोन ग्रह राशी बदलासह आता नक्षत्र बदल करत आहेत. हे दोन्ही ग्रह सध्या मीन राशीत आहेत. पण २८ एप्रिल रोजी शुक्र आणि शनि उत्तर भाद्रपदा नक्षत्रात युती करत आहेत. शुक्र आणि शनि या मैत्रीपूर्ण ग्रहांच्या युतीमुळे १२ पैकी ३ राशींना भरपूर फायदे मिळू शकतात. नोकरी व्यवसायात त्यांना भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे.
द्रिक पंचांगानुसार, शुक्र २६ एप्रिल रोजी रात्री १२ वाजून ०२ मिनिटांनी उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल आणि १६ मे पर्यंत या नक्षत्रात राहील. दुसरीकडे, न्यायदेवता शनि २८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल . अशा परिस्थितीत दोन्ही ग्रहांची २८ एप्रिल रोजी उत्तर भाद्रपदा नक्षत्रात युती होईल. या युतीने अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात जास्तीत जास्त सकारात्मक बदल दिसून येतील.
शनि-शुक्राचा उत्तर भाद्रपदा नक्षत्रातील प्रवेश ‘या’ राशींसाठी ठरेल फलदायी (Venus And Saturn Conjunction In Uttarashada Nakshtra)
तुळ (Libra Zodiac Sign)
तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्र-शनीची युती अनुकूल ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येणार आहे. तुमच्या मामाबरोबरचे तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होऊ शकतात. तुम्हाला अनेक मार्गांनी आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. पदोन्नतीसह पगार वाढण्याची शक्यता आहे.
वृषभ (Tarus Zodiac Sign)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनि – शुक्र यांची युती फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायातही खूप फायदे मिळू शकतो. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच खास ठरु शकतो. तुम्ही कुटुंब आणि मित्रांबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. समाजात आदर वाढू शकतो. तुमच्या भावा-बहिणींबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. आरोग्य चांगले राहणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. याच्या मदतीने शत्रूंवर विजय मिळवता येतो.
कर्क (Cancer Zodiac Sign)
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र-शनीची युती शुभ सिद्ध होऊ शकते. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश आणि भौतिक सुखाचा अनुभव घेता येईल. तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. या काळात तुमच्या नशीबी अनेक आनंदाचे क्षण येऊ शकतात. अध्यात्माबद्दल तुमची आवड झपाट्याने वाढू शकते. तुम्ही एखाद्या तीर्थस्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता. कामाच्या निमित्ताने तुम्हाला खूप प्रवास करावे लागू शकतो. पण यातून तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. वाहन, घर खरेदीसाठी हा उत्तम काळ आहे.