Conjunction Of Saturn And Venus: ज्योतिषशास्त्रानुसार शनीला कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हटले जाते. तर शुक्र ग्रहाला सुख, समृद्धी आणि प्रेमाचा कारक ग्रह म्हटले जाते. २९ मार्च रोजी शनी आणि शुक्राची मीन राशीत युती निर्माण होईल. ही युती तब्बल ३० वर्षानंतर मीन राशीत निर्माण होणार आहे. ज्याचा शुभ प्रभाव नक्कीच काही राशींच्या आयुष्यावर पडेल. या व्यक्तींना प्रत्येक कार्यात यश मिळेल तसेच मनातील इच्छाही लवकर पूर्ण होतील.

‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींना शनी-शुक्राची युती खूप सकारात्मक ठरेल. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील.

धनु

शनी-शुक्राची युती धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल. परदेश जाण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबाची आर्थिक परस्थिती अधिक मजबूत होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील.

मिथुन

शनी-शुक्राची युती मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी भाग्यशाली सिद्ध होईल. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासह दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)