षडाष्टक योग: ग्रहांचा राजा, सूर्य दर महिन्याला राशी बदलतो. सूर्यदेवाला मान-सम्मान, सुख, समृद्धी, आत्म्याचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत, सूर्याच्या राशीच्या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर नक्कीच होतो. ज्योतिषशास्त्रानुसार १६ सप्टेंबर रोजी सूर्याने आपली राशी बदलून कन्या राशीत प्रवेश केला. सूर्य कन्या राशीत प्रवेश करताच शनीची वाईट नजर त्यावर पडते. शनीची वाईट नजर सूर्यावर पडल्यामुळे षडाष्टक नावाचा धोकादायक योग तयार होत आहे. सूर्य आणि शनीच्या षडाष्टक योगाचा अशुभ प्रभाव काही राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करू शकतो. चला जाणून घेऊया, सूर्य आणि शनीच्या षडाष्टक योगामुळे कोणत्या राशींना जीवनात अडचणी येऊ शकतात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिषशास्त्रानुसार शनि सध्या त्याच्या मूळ त्रिकोणी कुंभ राशीत विराजमान आहे. अशा स्थितीत तो कन्या राशीच्या सहाव्या घरात विराजमान आहे. त्याचवेळी सूर्याचा लग्न घरात प्रवेश झाला आहे. अशा स्थितीत शनिची दृष्टीने सूर्यावर पडली आहे.

हेही वाचा – Ganesh Chaturthi 2025 : पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी कोणत्या तारखेला साजरी होईल? जाणून घ्या नेमकी तारीख आणि महत्त्व

वृषभ राशी

षडाष्टक योग या राशीच्या लोकांसाठी अजिबात फायदेशीर ठरणार नाही. या राशीच्या लोकांना शारीरिक, मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याबरोबर करिअर आणि बिझनेसमध्येही अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. वाहन चालवताना थोडे लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय थोडा विचार करूनच घ्या. घाईघाईने घेतलेला निर्णय तुमच्या भविष्यासाठी अडचणीत येऊ शकतो. यासह, जर आपण व्यवसायाबद्दल बोललो तर एखादा प्रकल्प किंवा ऑर्डर रद्द केली जाऊ शकते. यामुळे तुमचे खूप आर्थिक नुकसान होऊ शकते. नात्यांबाबतही थोडे सावध आणि सतर्क राहण्याची गरज आहे. अशुभ प्रभाव टाळण्यासाठी शनि आणि सूर्य मंत्राचा जप करा.

हेही वाचा – कितीही अडचणी आल्यातरी कधीही हार मानत नाही ‘या’ ५ राशीचे लोक! संकटाचा धैर्याने सामना करतात, तुमची रास आहे का यात?

मकर राशी

षडाष्टक योग या राशीच्या लोकांसाठीही लाभदायक ठरणार नाही. शनीच्या प्रभावामुळे तुमच्या सर्व कामात काही ना काही अडथळे येऊ शकतात. याचसह करिअरच्या क्षेत्रात थोडी काळजी घ्या. सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. बॉस तुमच्या कामावर नाराज असू शकतात. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. नोकरी बदलण्याचीही शक्यता आहे. याचसह तुम्हाला व्यवसायात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. घरच्यांशीही एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. आरोग्याबाबत थोडे सावध राहा.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani surya gochar 2024 saturn and sun make shadashtak yog these zodiac sign faces financial and job related problems snk