Shani Vakri 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्याच्या सुरुवातीला शनी व सूर्य पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचे समजत आहे. १७ जूनला शनिदेव वक्री होणार आहेत आणि सध्या न्यायाधिकारी शनी महाराज कुंभ राशीतच स्थिर आहेत, ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार १५ जूनला मिथुन राशीत सूर्य प्रवेश घेणार आहे. सूर्याचे मिथुन राशीतील स्थान व शनीचे वक्री अवस्थेत कुंभ राशीतील स्थान यामध्ये एकमेकांच्या प्रभावकक्षा एकत्र होणार आहेत. यामुळे एका महिन्याभरात काही राशींच्या भाग्यात प्रचंड धनलाभ तर काहींना कष्ट अनुभवावे लागू शकतात. शनी व सूर्य हे पिता-पुत्र असल्याचे मानले जाते त्यामुळे यांच्या एकत्र येण्याने ४ राशी फायद्यात राहू शकतील असे अंदाज आहेत. या राशी कोणत्या व त्यांना नेमका काय लाभ होऊ शकतो हे पाहुयात..
शनी- सूर्य युती ‘या’ राशींना बनवणार धनवान?
मिथुन रास (Gemini Zodiac)
ज्योतिष शास्त्रानुसार १५ जूनला सूर्य मिथुन राशीत येणार आहे. हे गोचर होताच मिथुन राशीच्या मंडळींना पद- प्रतिष्ठेबाबत लाभ होऊ शकतो. या काळात तुम्हाला धनलाभ व व्यवसाय वृद्धी अनुभवता येऊ शकते. याकाळात आपल्याला वैवाहिक जीवनात ताण अनुभवावा लागू शकतो पण जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला भागीदारीतून ताळमेळ साधत आर्थिक व मानसिक लाभ होऊ शकतो. पोटाची विशेष काळजी घ्यावी लागू शकते.
सिंह रास (Leo Zodiac)
सूर्य व शनीचे गोचर सिंह राशीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते. या काळात आपल्याला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत मिळू शकते. या कालावधीत अनेक महत्त्वाची व प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. मानसिक शांतीसाठी तुम्हाला इतरांच्या अनावश्यक मताकडे दुर्लक्ष करणे गरजेचे ठरेल. शुभ कामामध्ये खर्च होऊ शकतो पण यामुळे तुम्हाला समाधानी वाटू शकते. घरगुती मंगलकार्याच्या निमित्ताने कुटुंबियांसह वेळ घालवण्याची संधी येईल.
कन्या रास (Virgo Zodiac)
सूर्य व शनीचे गोचर कन्या राशीला करिअर व व्यवसायात मोठ्या स्थानावर जाण्याची संधी मिळवून देऊ शकते. येत्या काळात तुम्हाला जुन्या मित्रांची अचानक मदत मिळू शकते. कामाच्या ठिकाणी पगारवाढीचा योग आहे. कुटुंबासह धार्मिक कारणाने एखादा प्रवास घडू शकतो. वैवाहिक नात्यात गोडवा वाढण्याची चिन्हे आहेत.
हे ही वाचा<< लक्ष्मी कृपेने ‘या’ राशींमध्ये धन राजयोग बनल्याने होणार बक्कळ धनलाभ? ‘या’ रुपात पैसे व प्रेम मिळू शकते
मकर रास (Capricorn Zodiac)
सूर्यदेव तुमच्या राशीला लाभ मिळवून देण्यासाठी अप्रत्यक्ष प्रभाव दाखवू शकतील. नोकरीमध्ये तुम्हाला यश लाभू शकते जेणेकरून तुम्हला योगायोगाने धनलाभ होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांमध्ये नशीब आजमावून पाहणाऱ्यांना यशाची पूर्ण शक्यता आहे. सरकारी नोकरीची संधी चालून येऊ शकते. तुमच्या राशीचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत त्यामुळे तुम्हाला येत्या काळात संधी हेरून काम करण्याची गरज आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)