या वर्षी शनि राशी परिवर्तन होणार आहे. गेल्या वर्षी शनीने आपली राशी बदलली नाही. पण या वर्षी २९ एप्रिलला शनी आपली राशी बदलणार आहे. या काळात शनि मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. शनी हा या दोन्ही राशींचा अधिपती ग्रह आहे. शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच काही लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील, तर काहींच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. परंतु मुख्यतः हे संक्रमण धनु राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनी गोचर २०२२

२४ जानेवारी २०२० पासून शनी ग्रह मकर राशीत गोचर करत आहे. आता २९ एप्रिल २०२२ रोजी कुंभ राशीत गोचर सुरू होणार आहे. शनीने राशी बदलण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. २९ मार्च २०२५ पर्यंत शनी कुंभ राशीत राहील. यानंतर मीन राशीमध्ये गोचरची सुरुवात होईल. ५ जून रोजी शनी पूर्वगामी होईल आणि १२ जुलै रोजी मकर राशीत त्याच्या पूर्वीच्या गोचरमध्ये परत येईल.

आणखी वाचा : या ३ अक्षराच्या मुली असतात भाग्यवान, लग्नानंतर ज्या घरात जातील तिथे होईल धनवर्षाव

धनु राशीच्या लोकांसाठी सुरु होतील चांगले दिवस

२९ एप्रिल २०२२ रोजी धनु राशीच्या लोकांना शनी साडेसातीपासून मुक्ती मिळेल. धनु राशीच्या लोकांचे चांगले दिवस शनीच्या दशेतून मुक्त होताच सुरू होतील. उत्पन्न वाढेल, गुप्त धन मिळण्याची शक्यता आहे. प्रवासातून चांगली कमाई करण्यात यशस्वी व्हाल. या कालावधीत तुम्हाला भरपूर पैसे मिळतील आणि तुम्ही पैशांची बचत देखील करू शकाल. जे लोक दीर्घकाळ परदेशात जाण्याचा विचार करत होते, त्यांचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचारही करू शकता.

आणखी वाचा : सर्वांसमोर नवऱ्यावर भडकली अंकिता लोखंडे; पाहा होळी पार्टीत असं काय घडलं…

विवाहासाठी असतील शुभ योग

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. या काळात तुम्हाला लग्नाचे चांगली स्थळ येऊ शकतात किंवा तुमचं लग्न होऊ शकतं. या काळात तुम्हाला पाहिजे तसा जीवनसाथी भेटण्याची दाट शक्यता आहे. या राशीच्या विवाहित महिलांसाठी शनीचे गोचर शुभ असेल.

आणखी वाचा : वयाच्या ४७ व्या वर्षी काजोल होणार तिसऱ्या बाळाची आई? या VIRAL VIDEO वरून चर्चा

कठोर परिश्रमाचे मिळेल फळ

या काळात तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात तुमच्या प्रयत्नांचे फळ नक्कीच मिळेल. अचानक लाभ किंवा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. तर, तुम्ही तुमच्या आवडीशी संबंधित कोणताही व्यवसाय करण्याची योजना देखील करू शकत

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)