Shani transit 2024: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून, २८ मार्च २०२५ पर्यंत शनी याच राशीत असेल. त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करील. दरम्यान, तोपर्यंत हा १२० दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल.

शनी देणार आनंदी आनंद

मेष

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
shani gochar 2025 | horoscope | astrology
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
guru and shukra yuti | Gaj Lakshmi Rajyog
Gaj Lakshmi Rajyog : मिथुन राशीमध्ये १२ वर्षानंतर निर्माण होणार गजलक्ष्मी राजयोग, या तीन राशींचे नशीब चमकणार, होणार आकस्मिक धनलाभ
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश

पुढील १२० दिवस मेष राशीच्या शुभ परिणाम घडवून आणेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.

तूळ

शनीची कुंभ राशीतील उपस्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. हा १२० दिवसांचा काळ तूळ राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील.

हेही वाचा: २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी होणार मालामाल; राहूचे नक्षत्र परिवर्तन देणार पैसाच पैसा

सिंह

कुंभ राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. १२० दिवसांच्या या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)