Saturn Transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावीक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायप्रिय देवता व कर्मफलदाता म्हटले जाते. जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात अशा व्यक्तींवर शनीदेवाची सदैव कृपा असते. शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून, २८ मार्च २०२५ पर्यंत शनी याच राशीत असेल. त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करील. दरम्यान, तोपर्यंत हा २१६ दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल.

२१६ या राशींना शनी करणार मालामाल

मेष

Transit of saturn 85 days Saturn will give money
८५ दिवस शनि देणार पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Saturn enter purva bhadrapada nakshatra
शनिचा जबरदस्त प्रभाव; पुढील काही तासांत ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस
Budha Gochar 2024
बुधदेव करणार मालामाल! सप्टेंबरपासून ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा? १२ महिन्यांनी बुध स्वतःच्या राशीत येताच कुणाला होणार फायदा?
Shukra Nakshatra Gochar 2024
२ सप्टेंबरपासून धन-वैभवाचा दाता शुक्र ‘या’ राशींवर करेल कृपा! मिळेल भरपूर यश अन् बक्कळ पैसा
Shani Nakshatra Parivartan
उद्यापासून ‘या’ राशींवर शनिदेव असणार मेहेरबान, अच्छे दिन सुरु? शनी महाराज चाल बदलून तुम्हाला कोणत्या रूपात देतील श्रीमंती?
Mars-Moon make conjunction 2024
पैसाच पैसा! मंगळ-चंद्राची युती निर्माण करणार ‘महालक्ष्मी योग’; ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा
September 2024 Grah Rashi Parivartan in Marathi
सप्टेंबर सुरु होताच ‘या’ राशींच्या व्यक्तींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? ३ मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, कुणाला होणार फायदा?

कुंभ राशीतील शनी मेष राशीच्या व्यक्तींसाठी पुढचे २१६ दिवस अनेक चांगले बदल घडवून आणेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी विचार करून घ्या. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

सिंह

कुंभ राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची खूप साथ मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. २१६ दिवसांच्या या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मात्र, प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होतील, ते दूर करण्याचा प्रयत्न करा. या दिवसात भाग्याची साथ मिळेल.

हेही वाचा: शुक्र देणार बक्कळ पैसा; कन्या राशीत निर्माण होणार युती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर देवी लक्ष्मीची असणार कृपा

तूळ

शनीची कुंभ राशीतील उपस्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. हा २१६ दिवसांचा काळ तूळ राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमचा माणसिक तणाव दूर होईल. या काळात तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही. त्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)