Shani transit 2024: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तसेच वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून, २८ मार्च २०२५ पर्यंत शनी याच राशीत असेल. त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करील. दरम्यान, तोपर्यंत हा ८० दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल.

तीन राशींसाठी शनी ठरणार फायदेशीर

तूळ

9 January Daily Horoscope In Marathi
९ जानेवारी पंचांग: भरणी नक्षत्रात मनातील चिंता होतील दूर! कोणाचा आत्मविश्वास वाढेल तर कोणाला कौटुंबिक सौख्य लाभेल; वाचा १२ राशींचे भविष्य
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Shadashtak Yog 2025
आजपासून बुध-मंगळ निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ तीन राशीचे व्यक्ती भरपूर पैसा कमावणार
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
The luck of these zodiac signs will shine on January 28th
२८ जानेवारीला चमकणार ‘या’ राशींचे नशीब, शुक्र ग्रह निर्माण करणार मालव्य राजयोग!
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
Rahu Mangal Gochar 2025
Rahu Mangal Gochar 2025 : १०० वर्षानंतर राहु आणि मंगळ बदलणार चाल, ‘या’ तीन राशी होणार मालामाल, मिळणार पैसाच पैसा!

शनीची कुंभ राशीतील उपस्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. हा ८० दिवसांचा काळ तूळ राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील.

सिंह

कुंभ राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. ८० दिवसांच्या या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

हेही वाचा: आजपासून बुध-मंगळ निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ तीन राशीचे व्यक्ती भरपूर पैसा कमावणार

मेष

पुढील ८० दिवस मेष राशीच्या शुभ परिणाम घडवून आणेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader