Shani Dev Nakshtra Parivantan: ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी आपले स्थान बदलून राशी व नक्षत्र परिवर्तन करतात. याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. काहींना याचे परिणाम शुभ- अशुभ रूपात स्पष्ट दिसतात तर काहींना अप्रत्यक्ष प्रचिती येते. येत्या १५ मार्चला ३० वर्षांनी सर्वात मोठा व महत्त्वाचा ग्रह म्हणजेच शनि नक्षत्र परिवर्तन करणार आहे. शनिदेव हे कलियुगातील न्यायदेव म्हणून ओळखले जातात. १५ मार्चला शनिदेव हे शतभिषा नक्षत्रात प्रवेश घेणार आहेत. शतभिषा हे राहूचे नक्षत्र आहे. शनि व राहू यांच्यात मित्रता आहे यामुळे शनि व राहूच्या युतीने काही राशींचे भाग्य उजळण्याची चिन्हे आहेत. या काळात ३ राशींना प्रचंड धनलाभ व प्रगतीचे योग आहेत. या नशीबवान राशी कोणत्या जाणून घेऊयात..
मिथुन (Gemini Zodiac)
मिथुन राशीला शनिदेवाचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. या काळात आपल्याला व्यवसायात प्रचंड धनलाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी मिळू शकते व नोकरीच्या क्षेत्रातही नवीन संधी दार ठोठावण्याची शक्यता आहे. आपल्याला नशिबाची जोरदार साथ लाभू शकते. सर्व बिघडलेली कामे मार्गी लागू शकतील. येत्या काळात तुम्हाला मनःशांती लाभू शकते. परदेशी कंपनीसह व्यापाराची संधी लाभू शकते. तुमच्या वडिलांसह नात्यात सुधारणा होऊ शकते.
सिंह (Leo Zodiac)
शनिदेवाचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकते. या काळात समजूतदार स्वभाव तुमची मदत करेल. जोडीदारासह नात्यात गोडवा वाढू शकतो जेणेकरून तुमचे वैवाहिक जीवन सुखकर होऊ शकते. तुम्हाला येत्या काळात कामात सुद्धा प्रगतीचे योग आहेत. तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो पण तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमचे अडकलेले पेमेंट्स वेळीच मिळाल्याने भविष्यात तुम्हाला गुंतवणूक करण्याची संधी लाभू शकते.
हे ही वाचा<< २५ फेब्रुवारी २०२३ पासून मंगळ ‘या’ राशींना बनवणार श्रीमंत? तुमच्या राशीलाही मिळणार प्रचंड धनलाभाची संधी
मकर (Capricorn Zodiac)
मकर ही मुळातच शनिच्या स्वामित्वाची रास आहे. त्यामुळे नक्षत्र परिवर्तन होताच मकर राशीसाठी सुद्धा शुभ काळ सुरु होऊ शकतो. येत्या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो. तसेच स्वतःच्या मेहनतीने आपण नवीन नोकरीची संधी सुद्धा मिळवू शकता. जुन्या आजारांपासून सुटका मिळू शकते. प्रगतीची नवी कवाडे उघडतील. कोर्टाचे खटले मार्गी लागतील. तुम्हाला शेअर बाजारातून लाभाचे योग आहेत.
(टीप: वरील लेख हा गृहितके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)