Aquarius Yearly Horoscope 2023 in Marathi: ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत. शनिदेव हे न्यायप्रिय असल्याने त्यांना कर्मदाता अशीही ओळख आहे. येत्या नववर्षात शनि तब्बल ३० वर्षांनी आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. १ जानेवारी २०२३ पासूनची कुंभ राशीतील अपेक्षित ग्रहस्थिती पाहिल्यास, आपल्या राशीच्या दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी अनुक्रमे गुरु, चंद्रमा व राहू युती तयार होत आहे. चौथ्या स्थानी मंगळ ग्रह स्थित आहेत तर ११ व्या स्थानी सूर्य व बुध ग्रहाचा बुधादित्य राजयोग प्रभावी असणार आहे. १२ व्या स्थानी शनि व शुक्र आपल्या राशीत एकत्र येतील तर नवव्या स्थानी केतू ग्रह विराजमान असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१७ जानेवारीला शनिदेव कुंभ राशीच्या लग्न भावी गोचर करून स्थिर होणार आहेत. यामुळे शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होणार आहेत. ऑक्टोबर मध्ये आपल्या राशीच्या कुंडलीत राहू सुद्धा प्रवेश करून केतू सह आठव्या स्थानी युती करणार आहे. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार आपल्याला म्हणजेच कुंभ राशीला येणारे २०२३ हे वर्ष कसे जाणार? आर्थिक लाभ होणार का? आरोग्य साथ देणार का? या व अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेउयात..
कुंभ राशीचे शिक्षण व करिअर (Career Of Aquarius Zodiac In 2023)
वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२३ हे वर्ष शुभ ठरू शकते. यावर्षी आपल्याला परदेशी शिक्षणाची संधी लाभू शकते. आपल्याला एखाद्या मानाच्या कॉलेज/ शैक्षणिक संस्थेतून शिष्यवृत्तीसहित शिक्षणाची संधी मिळू शकते. मात्र तुम्हाला लक्ष केंद्रित करून या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. थोड्या निष्काळजीपणामुळे सर्व काही हातातून निसटून जाऊ देऊ नका.
कुंभ राशीचे वैवाहिक जीवन (Married Life And Relationship Of Aquarius Zodiac In 2023)
कुंभ राशीच्या मंडळींचे वैवाहिक जीवन किंवा प्रेम संबंध हे बऱ्यापैकी स्थिर असतील. शनिदेव १७ जानेवारीला आपल्या राशीत येताच सातव्या स्थानी आपली दृष्टी ठेवतील हे स्थान लग्न स्थान असते त्यामुळे तुम्हाला काही अंशी वक्री दृष्टीला सामोरे जावे लागू शकते. तुमची चिडचिड वाढण्याची शक्यता आहे. चुकूनही जोडीदाराबाबत गैरसमज करून घेऊ नका. कदाचित त्यात काहीच तथ्य नसेल मात्र तुम्ही संशय घेऊन तुमच्या प्रिय व्यक्तीचे मन दुखावण्याची जास्त शक्यता आहे. याशिवाय संवादावर अधिक भर द्या. गुरु ग्रह एप्रिल पासून आपल्या राशीत शुभ स्थानी असल्याने प्रेम कायम राहील.
हे ही वाचा<< १ जानेवारीपासून कर्क राशीत शनिदेव घडवणार सर्वात मोठे बदल? २०२३ मध्ये आर्थिक स्थिती, प्रेम, आरोग्य कसे असणार?
कुंभ राशीला धनलाभ होणार का? (Finance Of Aquarius Zodiac In 2023)
वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार जरी 2023 मध्ये आपल्या राशीत शनिदेव येत असले तरीही कुंभ ही शनिची आवडती रास आहे. यामुळेच साडेसातीमध्ये सुद्धा या राशीला प्रचंड त्रास सहन करावा लागत नाही. येत्या नववर्षात आपल्याला आर्थिक बाबीत यश लाभण्याचे योग आहेत. आपण काळजीपूर्वक व्यवहार केल्यास बँक बॅलेन्स सुद्धा दुप्पटीने वाढू शकतो. सेव्हिंगवर भर द्या. गुरु व राहूच्या प्रभावाने आपल्याला एप्रिल पासून प्रचंड धनलाभ होऊ शकतो.
हे ही वाचा<< २०२३ सुरु होताच ‘या’ ४ राशींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? शनिचा दुर्मिळ ‘महालक्ष्मी राजयोग’ तुमच्या राशीत आहे का?
कुंभ राशीचे आरोग्य (Health Of Aquarius Zodiac In 2023)
२०२३ मध्ये आपल्याला आरोग्याची खास काळजी घ्यायला हवी. तुमचे आजार हे तुमच्या सवयींमधून उद्भवतील. तुम्हाला शेवटचे दोन महिने प्रचंड आळस येऊ शकतो. यामुळे काही कामे पुढच्या महिन्यात ढकलण्याचा तुमचा प्रयत्न असेल पण असे केल्यास आपल्याला नुकसान होऊ शकते. शनिच्या प्रभावाने आपल्याला पाठीची दुखणी सतावू शकतात. जुना एखादा आजार डोके वर काढू शकतो. विशेषतः जानेवारी, मार्च, जून, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये आरोग्याची काळजी घ्या.
हे ही वाचा<< २०२३ मध्ये २ वेळा लागणार सूर्यग्रहण; ‘या’ राशींना बक्कळ धनलाभाची संधी, ‘या’ राशींना सूर्यदेव देऊ शकतो त्रास
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)