Saturn Transit In Kumbh Rashi: शनी हा एक संथगतीने चालणारा ग्रह आहे. बारा राशींचा प्रवास पूर्ण करण्यास त्याला अंदाजे २९ वर्ष ६ महिने लागतात. तर शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा काल अडीच वर्षाचा असतो. आर्थिक स्थिती, मानसिकता, वैवाहिक सुख, गुन्हेगारी, शिक्षा, अपंगत्व या साऱ्या गोष्टी शनी ग्रहावरून ओळखता येतात. शनी जर पत्रिकेत सुस्थितीत असेल तर पैसा, वैवाहिक सौख्य, सुख- समाधान उत्तम प्राप्त होते. त्यामुळे कुंडलीशास्त्रात शनी ग्रहाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. येत्या १७ जानेवारीला ३० वर्षांनी शनिदेव स्वराशीत परतणार आहेत. अशावेळी कोणत्या राशींची साडेसाती सुरु होणार हे आपण प्रसिद्ध ज्योतिष तज्ज्ञ उल्हास गुप्ते यांच्याकडून जाणून घेऊयात. तसेच या काळात कोणत्या गोष्टी केल्यास साडेसातीतही धनलाभ होऊ शकतो हे ही पाहूयात ..

मेष (Aries Zodiac)

शनी अकराव्या अर्थात लाभ स्थानात येत आहे. हा शनी वर्षभर आपल्याला उत्तम साथ देईल. जागोजागी मदतीचे हात पुढे येतील. पण या काळात आपल्याला संयम सावधानता आणि विनय बाळगून काम करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.

Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
surya gcoahr 2024
२३ दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; मकर राशीतील प्रवेशाने ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Shani Sade Sati 2025
३० वर्षानंतर मेष राशीवर सुरू होणार शनिची साडेसाती, जाणून घ्या, कसे जाणार २०२५ वर्ष?
After 12 years the alliance of Jupiter and Moon will brighten the fortunes of 4 zodiac signs dreams will be fulfilled in 2025
१२ वर्षांनंतर गुरू आणि चंद्रच्या युतीने ४ राशींचे भाग्य उजळणार, २०२५मध्ये स्वप्न होतील पूर्ण, घर-वाहन खरेदीचा निर्माण होईल योग
Surya Grahan 2025 And Shani Gochar
१०० वर्षांनंतर निर्माण होणार शनी गोचर आणि सुर्य ग्रहाचा संयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरु होईल सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात मिळेल यश
shukra grah created Malavya Rajyog
शुक्र ग्रह बनवणार मालव्य राजयोग, जानेवारीमध्ये या राशींचे पालटणार नशीब , होणार अपार धनलाभ

वृषभ (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या मंडळींनी पण व्यवहार आणि भावना यांचे समीकरण जपायला हवे. पैशाचा अपव्यय टाळा. कौटुंबिक जीवनांत बद्धपणे वागू नका. स्तुतीपाठकापासून दोन हात दूर रहा. मात्र मैत्री जपा.

मिथून (Gemini Zodiac)

राजकारणात वा सामाजिक कामात कायद्याची कक्षा जरुर पाळावी. शारिरीक ताकदीपेक्षामनाचे बळ खूप मोठे असते. अशावेळी आपली खरी मानसिकता आपल्या जिभेवर घोळत असते. त्यामुळे विचारपूर्वक बोलणे हिताचे ठरेल.

कर्क (Cancer Zodiac)

ज्येष्ठ लोकांनी विशेष काळजी घ्यावी. काहीशी चंचलता लहरीपणा वाढेल त्यामुळे निर्णय घेण्यातील ठामपणा हरवू नका. लोक प्रवाहाच्या विरोधात बोलणे. पुरोगामी असल्याचा आव आणणे अतिस्पष्ट बोलून वादविवादाला विकृत स्वरुप देणे टाळा.

सिंह (Leo Zodiac)

आरोग्य सांभाळा पोटाचे विकार आजार यासाठी पथ्य पाणी आवश्यक ठरेल. क्रोध, अति विचार गैरसमज यापासून कटाक्षाने दूर रहा. आरोग्यच्या रूपात सर्वात मोठी धनसंपत्ती लाभू शकते

कन्या (Virgo Zodiac)

भावना आणि व्यवहार याचे गणित खूप चातुर्याने सांभाळा. थोरा -मोठ्याच्या भेटीतून नव्या कल्पनांना चालना मिळेल. त्यात उत्कर्षाची नवीन दिशा लाभेल.

तूळ (Libra Zodiac)

शेअर्स, म्युच्युअल फंड यात केलेली गुंतवणूक फायदेशील ठरेल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणात विशेष प्रगती दिसून येईल. यासाठी आवर्जून तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

कौटुंबिक सुखात होणारे मतभेद पंचमातील गुरु व षष्ठातील राहू वाढू देणार नाहीत पण अति हट्टीपणा हेकेखोरपणाला मुरड घालण्यातच आपले हित आहे. स्थावर इस्टेट मालमत्ता शेती वाडीच्या खरेदीविक्रीतून फायदा होईल. कोर्टकचेरी निकालात यश लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

धनु (Sagittarius Zodiac)

आर्थिक बाबतीतली उलाढाल समाधानकारक घडेल. जुन्या समस्या संपुष्टात येतील. पण या सर्वात कुठेही भावनेचा अतिरेक टाळा. भरवसा अतिविश्वास ठेवू नका. स्वत: सक्रीय रहा. व स्वत:वर नियंत्रण ठेवा.

मकर (Capricorn Zodiac)

शनी धनु व मकरेत असताना जातकाला साडेसातीचा खूप त्रास होतो, पण शनी कुंभ राशीला प्रवेश करताच सारे चित्र बदलते. पैसा गुंतवल्याने बऱ्यापैकी फायदा होतो. शेअर्स उद्योगातील गुंतवणूक खूप महत्त्वाची ठरते. अति दगदग टाळा

कुंभ (Aquarius Zodiac)

स्वराशीत कुंभेत शनी येण्याआधी मकरेतील शनीमुळे साडेसातीचा कुंभ राशीला अडीच वर्ष नक्कीच त्रास झाला असेल. पण आता प्रत्यक्षात शनी कुंभ राशीत प्रवेश करीत आहे आणि हा शनी खूप लाभदायक ठरेल. बुद्धी प्रयत्न आणि श्रम यातून या राशीला उत्तम यश प्राप्ती होईल.

हे ही वाचा<< १७ जानेवारीपासून १२ राशींच्या तन, मन, धनावर शनीचे राज्य! कोण होणार श्रीमंत? कोणाची साडेसाती संपणार?

मीन (Pisces Zodiac)

अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल त्यात होणारी आवक गोठेल व त्यातून चिंता प्राप्त होईल पण मूळात गुरु मीन राशीत स्वगृही असल्यामुळे खूपशा घटनांचे विपरीत परिणाम फारसे होणार नाहीत. तरी पैशाची बचत करून पैसे जपून वापरणे हा नियम स्वत:ला लावून घ्या. राजकारणात, सामाजिक कार्यात मोठ्या जबाबदाऱ्या घेऊ नका. वचने आश्वासन देणे टाळा.

Story img Loader