Trigrahi Yog In Capricorn: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह जेव्हा राशी व नक्षत्र परिवर्तन करतात तेव्हा मानवी जीवनावर त्याचा शुभ- अशुभ प्रभाव दिसून येत असतो. येत्या मकरसंक्रांतीला तीन मोठे ग्रह मकर राशीत एकत्र येणार आहेत. १४ जानेवारीला शनि, शुक्र व सूर्य देवाच्या युतीने मकर राशीत त्रिगही राजयोग तयार होत आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार अशा तीन राशी आहेत ज्यांना या त्रिगही राजयोगाने सर्वाधिक धनलाभ व प्रगतीचे योग आहेत. या राशींना त्रिगही योगाचा फायदा होऊन करिअर व व्यवसायात प्रचंड लाभ होऊ शकतो. या राशी कोणत्या व त्यांना नेमका काय लाभ होणार हे आपण जाणून घेऊयात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्रिगही योगाने ‘या’ राशी होणार श्रीमंत?

मेष (Aries Zodiac)

त्रिगही राजयोग हा मेष राशीसाठी अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. आपल्या राशीच्या कुंडलीत दहाव्या स्थानी त्रिगही योग तयार होत आहेत. हे स्थान नोकरी व कार्यसिद्धीचे मानले जाते. येत्या काळात आपल्याला नव्या नोकरीच्या संधी लाभण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल झाल्यावर तुमच्या आयुष्याचा वेग व एकंदरीत मूड बदलू शकतो. या नव्या संधीत आपल्याला पैसे व प्रगती पुरेपूर लाभू शकते. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना सुद्धा प्रचंड धनलाभाची संधी आहे. आपल्याला येत्या काळात वडिलांसह नातेसंबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus Zodiac)

वृषभ राशीसाठी त्रिगही योग लाभदायक सिद्ध होऊ शकतो. आपल्या राशीच्या कुंडलीत नवव्या स्थानी त्रिगही योग तयार होत आहे. हे स्थान विदेश व भाग्याचे मानले जाते. या काळात आपल्याला नशिबाची साथ लाभेल. आपल्याला जुन्या गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो. वृषभ राशीच्या विद्यार्थी दशेतील मंडळींना परदेशी नोकरीच्या ऑफर येण्याची शक्यता आहे. येत्या काळात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात किंवा निदान त्या पूर्ण होण्याच्या दिशेने तुम्ही काही पाऊले पुढे जाऊ शकता. तुम्हाला या काळात जमिनीत गुंतवणूक करणे सर्वात फायदेशीर ठरू शकते.

हे ही वाचा<< २०२३ एप्रिल पर्यंत ‘या’ ३ राशींना बक्कळ धनलाभाची संधी; शनिदेव व गुरु एकत्र देऊ शकतात प्रचंड श्रीमंती

मीन (Pisces Zodiac)

त्रिगही योग मीन राशीच्या करिअर व व्यवसायासाठी लाभदायक ठरू शकतो. हा योग आपल्या राशीच्या ११ व्या स्थानी तयार होत आहे. या काळात आपल्या आर्थिक मिळकतीत वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या आर्थिक स्त्रोतांची वाढ होऊ शकते. आर्थिक फायद्यांसह खर्च सुद्धा वाढू शकतो. खर्चासह जर आपण गुंतवणूक सुरु केली तर भविष्यात स्थिर धनलाभ होऊ शकतो. अभिनय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या मंडळींना विशेष लाभाचे योग आहेत.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani transit and shukra gochar makes trigahi rajyog these lucky zodiac signs can get hoge money and profit svs