Vrushbh Rashi Varshik Bhavishya 2023 in Marathi: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव व मंगळदेव आहेत. शुक्रदेव हा भौतिक सुख, धन, वैभव व ऐश्वर्यदाता म्हणून ओळखला जातो. वृषभ राशीच्या भाग्यात २०२३ या वर्षात भाग्योदयाचे संकेत आहेत. १ जानेवारीपासूनच आपल्या राशीत ग्रहांची स्थिती अत्यंत अनुकूल असणार आहे. यावेळी मंगळ ग्रह आपल्या राशीच्या लग्न स्थानी असणार आहे तर अष्टम भावात सूर्य व बुद्धाच्या युतीने बुधादित्य राजयोग तयार होत आहे. १७ जानेवारी रोजी शनिदेव शुद्ध कर्मस्थानी स्थिर होणार आहेत तर प्रभावकक्षेत १२ व्या स्थानी गुरु बृहस्पती स्थिर होणार आहेत. या एकूण प्रभावाने वृषभ राशीचे २०२३ वर्ष कसे जाणार हे आज आपण पाहणार आहोत. येत्या वर्षात आपल्याला करिअर , व्यवसाय, वैवाहिक जीवन व आर्थिक दृष्टीने काय स्थिती अनुभवता येईल हे जाणून घेऊया..

वृषभ राशीच्या मंडळींसाठी आर्थिक स्थिती कशी असणार? (Finance Of Taurus Zodiac In 2023)

वृषभ राशीच्या मंडळींसाठी आर्थिक स्थिती उत्तम असणार आहेत. येत्या काळात आपण प्रॉपर्टी खरेदी करू शकता. गुरूचा प्रभावाने आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते.

Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
Budh Uday In Scorpio 2024 horoscope 2025
Budh Uday 2024 : ९ तासांनंतर बुध उदयाने एका झटक्यात ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळेल कलाटणी; तुम्हीही व्हाल कोट्यधीश?
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
rahu shukra yuti 2025 in marathi astrology
Rahu Shukra Yuti 2025: २०२५ वर्ष ‘या’ तीन राशींसाठी सुखाचं! राहू-शुक्राच्या संयोगाने मिळणार प्रचंड पैसा, आनंद अन् मान सन्मान
kharmas 2024 horoscope surya gochar 2024 in marathi
Kharmas 2024: १५ डिसेंबरपासून ‘या’ चार राशींवर मिळेल बक्कळ पैसा! खरमास सुरू होताच सूर्यदेवाच्या आशीर्वादाने धनलाभाची संधी

वृषभ राशीच्या करिअरची दिशा बदलणार? (Career Of Taurus Zodiac In 2023)

येत्या वर्षात आपल्याला जुन्याच कामाच्या ठिकाणी सर्वाधिक लाभ होऊ शकतो पण तत्पूर्वी आपल्याला नव्या ठिकाणहून सुद्धा जॉबची संधी मिळू शकते. तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेतल्यास फार बदल न करता तुम्हाला प्रचंड धनलाभ होऊ शकतो. येत्या काळात गुरु ग्रह आपल्या राशीच्या प्रभावकक्षेत १२ व्या स्थानी गोचर करणार आहे त्यामुळे आपले खर्च सुद्धा दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे. आपल्याला बजेटकडे लक्ष देणे गरजेचे ठरेल. शक्य होईल त्या प्रमाणात गुंतवणूक करण्याला प्राधान्य द्या

वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना कसे जाणार वर्ष? (Career Of Taurus Zodiac In 2023)

२०२३ हे वर्ष विद्यार्थ्यांना प्रगतीचे योग घेऊन येत आहे. पण त्यासाठी जून पर्यंत अपार मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला सरावातून शिकण्याची संधी मिळेल, अशा संधी सोडू नका. येत्या काळात आपण सरकारी परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करू शकता. तुम्हाला शैक्षणिक बाबीत वर्षाच्या अखेरीस प्रचंड प्रगती लाभू शकते.

वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य कसे राहणार? (Health Of Taurus Zodiac In 2023)

२०२३ या वर्षात आपल्याकडे इतक्या संधी असतील की आरोग्य तुम्हाला नेहमीच प्राधान्याने जपणे कठीण होऊ शकते. पण अशी चूक करू नका. गुरु ग्रह जेव्हा १२ व्या स्थानी येईल तेव्हा तुम्हाला मानसिक स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. थोड्या निष्काळजीपणाचा पडसाद दूरगामी ठरू शकतात. तुम्हाला आहारावर लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा आपल्याला पोटाच्या विकाराने अत्यंत त्रासदायक काळ अनुभवावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य जपावे लागू शकते.

वृषभ राशीचे वैवाहिक जीवन (Married Life And Relationship Of Taurus Zodiac In 2023)

येत्या वर्षात प्रेम संबंध व वैवाहिक जीवन अधिक मजबूत होऊ शकतात. तुमच्या प्रेमाच्या नात्याला एक पाऊल पुढे नेण्याची संधी तुम्हाला लाभू शकते. अविवाहित मंडळींना आपल्या जोडीदाराची साथ लाभेल ज्यातून तुमचं नातं सशक्त होऊ शकेल. तुमच्या नात्यात गोडवा वाढवणारा हा काळ असणार आहे. संतती प्राप्तीचे योग आहेत. तुम्हाला वर्षाच्या अखेरीस एकमेकांच्या मनाची काळजी घ्यावी लागू शकते.

हे ही वाचा<< मेष राशीसाठी २०२३ वर्ष कसे असणार? जूनपर्यंत प्रचंड धनलाभाची संधी, प्रेमाची स्थिती कशी असणार?

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader