Shani Transit Creates Rajyog In Kundli: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करतात ज्यामुळे शुभ- अशुभ योग तयार होत असतात. या योगांचा प्रभाव सर्व राशीवर त्या राशीतील ग्रहांच्या स्थितीनुसार दिसून येतो. अशातच जेव्हा मोठे ग्रह जसे की शनी, मंगळ, बुध, गुरु, शुक्र जेव्हा आपले स्थान बदलतात, इतर ग्रहांसह युती बनवतात तेव्हा त्याचा प्रभाव अधिक प्रभावशालीपणे दिसून येतो. २०२३ वर्षाच्या सुरुवातीलाच १७ जानेवारीला ३० वर्षातील शनीचे सर्वात मोठे गोचर झाले आहे. शनीने स्वराशीचा म्हणजेच कुंभमध्ये प्रवेश घेतला आहे. तर १५ फेब्रुवारीला शुक्र मीन राशीत प्रवेश घेणार आहे. यामुळे ४ राशींना भाग्योदयाचे योग आहेत. या ४ राशीच्या व्यक्तींच्या गोचर कुंडलीत राजयोग तयात होत असून यामुळे येत्या काळात प्रचंड धनलाभाची संधी मिळणार आहे.
वृषभ राशी (Taurus Zodiac)
वृषभ राशीसाठी शनी- शुक्र युतीचा राज्यतोग लाभदायक सिद्ध होऊ शकतो. १५ फेब्रुवारीला शुक्र ग्रह उच्च स्थानी असल्याने शनीसह युती करून केंद्र ट्रेन राजयोग साकारणार आहेत. याशिवाय शश महापुरुष राजयोग सुद्धा तयार होत आहे. यामुळे आपल्याला कामाचं ठिकाणी प्रगतीचे व पगारवाढीचे योग आहेत. आपल्याला जुन्या शेअर मार्केट गुंतवणुकीतून लाभाचे योग आहेत. याकाळात नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना उत्तम संधी चालून येणार आहे.
मिथुन राशी (Gemini Zodiac)
मिथुन राशीत राजयोग बनल्याने आपल्याला येत्या काळात मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. १५ फेब्रुवारीला शनी व शुक्र एकत्र मेळाव्या राजयोग साकारत आहेत. तसेच या राशीत हंस महापुरुष राजयोग सुद्धा तयार होत आहे. शुक्र आपल्या राशीच्या उच्च स्थानी असल्याने आपल्याला व्यवसायात धनलाभाची संधी आहे. तुम्हाला प्रवासाचे योग आहेत. नोकरीच्या निमित्ताने आपल्याला घरापासून लांब राहावे लागू शकते. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर आपल्याला येत्या काळात यशप्राप्तीचे योग आहेत. आपल्याला सुरु केलेल्या प्रत्येक कामात यशाची संधी आहे.
कन्या राशी (Virgo Zodiac)
कन्या राशीच्या मंडळींना करिअरमध्ये प्रगतीचे व धनलाभाचे योग आहेत. कोर्टाच्या खटल्यांमध्ये तुमच्या बाजूने निर्णय लागू शकतो तसेच तुमच्यावरील कर्ज कमी होण्यासही मदत होऊ शकते. १५ फेब्रुवारीला तयार होणाऱ्या मालव्य राजयोगाने आपल्याला प्रगतीसाठी मोठी पाऊले उचलता येतील. हंस राजयोग बनल्याने आपल्याला गुंतवणुकीतून लाभाची संधी आहे. व्यवसायात एखादी मोठी डील पूर्ण होऊ शकते. तुम्हाला नवीन ग्राहक व मिळकतीचे स्रोत लाभू शकतात.
हे ही वाचा<< २०२३ मध्ये महाराष्ट्रात उन्हाळा- पावसाळा कसा असणार? ज्योतिषांनी सांगितलं शिंदे सरकारसमोरचं ‘हे’ मोठं आव्हान
तूळ राशि (Libra Zodiac)
तूळ राशीसाठी हा राजयोग वरदान सिद्ध होऊ शकतो. शनिदेव आपल्या गोचर कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार करत आहेत. शनीची दृष्टी आपल्या राशीतील धन स्थानी असणार आहे. यामुळे नोकरदार मंडळींना पगारवाढ लाभण्याची शक्यता आहे. आपल्याला अडकून पडलेले पैसे परत मिळण्याची संधी आहे. कामात इच्छापूर्ती होऊ शकते.
हे ही वाचा<<१९ फेब्रुवारीपर्यंत ‘या’ ४ राशींना शनी देणार बक्कळ धनलाभ? त्रिगही योग ते महाशिवरात्री, कसा असेल आठवडा?
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)