Shani Sade Sati In 2023: ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह इतर राशींमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या राशीतील इतर ग्रहांच्या युतीने अनेक योग बनायला सुरुवात होते. याचा थेट प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. सर्व ग्रहांमध्ये शनिचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण शनिच्या चालीवरून कोणत्या राशीची साडेसाती सुरु होईल याविषयी माहिती मिळते. काहींना शनि गोचराने सुरु असलेल्या संकट काळातून मुक्ती मिळते तर काहींची साडेसाती इथूनच सुरु होते. येत्या नववर्षात म्हणजेच १७ जानेवारीला शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे याचा परिणाम इतर राशींवर दिसून येईल. ज्योतिष तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार यामुळे काही राशींच्या नशिबात भाग्योदय होणार आहे.
शनिचा कुंभ राशीत प्रवेश
शनि ग्रह जुलै २०२२ मध्ये मकर राशीत वक्री होऊन स्थिर झाला. यानानंतर आत २३ ऑक्टोबर २०२२ ला मकर राशीतून शनि मार्गी होणार आहे, या दरम्यान शनि उलट चाल बदलून पुन्हा सरळ मार्गी गोचर करणार आहे. शनि मकर राशीत १७ जानेवारी २०२३ पर्यंत मार्गी होणार असून इथेच भ्रमण होणार आहे. यानंतर शनि कुंभ राशीत प्रवेश घेणार आहे. जेव्हा शनि कुंभ राशीमध्ये गोचर करेल तेव्हा काही राशींची साडे साती संपणार आहे. तर काही राशींना मात्र शनिच्या प्रकोपाचा सामना करू लागू शकतो.
Vastu Shastra: पती पत्नीने एका ताटात का जेवू नये? भीष्म पितामह यांनी महाभारतात दिलेलं उत्तर पाहा
कोणत्या राशीत शनिची साडेसाती संपणार?
वैदिक पंचांगाच्या माहितीनुसार, १७ जानेवारी २०२३ मध्ये तूळ व मिथुन राशींना साडेसातीतून मुक्ती मिळणार आहे, तसेच धनु राशीतही शनिचा प्रभाव कमी होऊन साडेसाती संपुष्टात येणार आहे. या मुक्तीनंतर राशींच्या प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकतो. प्रलंबित कामे व नोकरीच्या समस्या कमी झाल्याने आयुष्यात आनंद व समृद्धीचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मुख्यतः प्रॉपर्टीच्या बाबत जर तुमचे काही काम अडून असेल तर ते मार्गी लागण्यात शनिचे गोचर मदत करू शकेल. जर आपण नवीन नोकरी शोधत असाल तर प्रगतीची संधी आहे, तुमच्या व्यापारात धनलाभाचे संकेत शनि घेऊन येणार आहे.
तसेच, शनि ग्रह कुंभ राशीत गोचर करताच मीन राशीची साडेसाती सुरु होणार असल्याचे म्हंटले जात आहे, म्हणजेच जानेवारी २०२३ पासून कुंभ, मकर आणि मीं राशीत शनिची साडे साती सुरु होणार असे संकेत आहेत. जानेवारी २०२३ मध्ये कर्क व वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनिचा प्रभाव जाणवेल. काही प्रमाणात शनिच्या साडेसातीचा सामना करावा लागू शकतो.
शनिदेव हे पुष्य, अनुराधा, पूर्वभाद्रपद नक्षत्रांचे स्वामी आहेत. त्यांना बुध आणि शुक्र यांच्यासोबत मैत्रीची भावना आहे. सूर्य, चंद्र आणि मंगळ हे शत्रू ग्रह मानले जातात.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे, यात अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)