Cancer Varshik Rashi Bhavishya 2023 in Marathi: ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र हा शांती स्वरूप मानला जातो. १ जानेवारी २०२३ पासून आपण कर्क राशीतील ग्रहांची व नक्षत्रांची स्थिती पाहिल्यास, आपल्या राशीच्या प्रभावकक्षेत चतुर्थ भावात केतू विराजमान आहेत. तर सहाव्या स्थानी बुध व सूर्याच्या युतीने बुधादित्य राजयोग तयार होत आहे. आपल्या राशीचं सातव्या स्थानी शनि व शुक्राची युती होत आहे तर नवव्या स्थानी गुरु व दहाव्या स्थानी चंद्र व राहूच्या युतीने ग्रहण दोष तयात होत आहे. सर्वात शुभ स्थानी मंगळ ग्रह स्थित आहेत.

१७ जानेवारीला शनिदेव आपल्या राशीच्या अष्टम स्थानी आहे त्यामुळे येत्या काळात आपल्या राशीत शनीची साडेसाती सुरु होण्याचे योग आहेत. येत्या वर्षात आपल्याला प्रत्येक बाबीत थोडं अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. असं असूनही वर्षाच्या मध्य महिन्यांमध्ये आपल्याला करिअरमध्ये प्रगती व धनलाभाचे योग आहेत. येणारे वर्ष तुमच्या राशीसाठी कसे जाणार हे जाणून घेऊयात..

Grah Gochar 2025 shukra gochar purva bhadrapad nakshatra
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
meen Rashi Bhavishya 2025 in Marathi
Pisces Yearly Horoscope 2025: २०२५ मध्ये ‘या’ राशीच्या मेहनतीचे होईल चीज! अनेक समस्यांमधून होईल सुटका; सोनल चितळेंकडून १२ महिन्यांचे राशिभविष्य जाणून घ्या
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख
Weekly Lucky Zodiac Sign 13 To 19 January 2025
Weekly Lucky Zodiac Sign 13 To 19 January 2025: बुध आणि शुक्र बदलणार राशी! ‘या’ चार राशी ठरतील भाग्यशाली, अचानक होईल धनलाभ
The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव

हे ही वाचा<< Yearly Horoscope 2023 : जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्याचं वार्षिक राशीभविष्य; जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसं असणार आगामी वर्ष

कर्क राशीच्या मंडळींसाठी आर्थिक स्थिती कशी असणार? (Business Of Cancer Zodiac In 2023)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार २०२३ हे वर्ष मार्च महिन्यापासून आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आपल्या राशीत गुरु गोचर करून स्थिर होणार आहेत तर राहू सुद्धा धनलाभाच्या स्थानी स्थिर आहेत. जेव्हा शनिदेव १७ जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा कर्क राशीचं प्रभावकक्षेत आठव्या स्थानी शनिचा प्रभाव सुरु होणार आहे. यामुळे तुम्हाला निदान मार्च पर्यंत आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात आणि तुम्हाला तुमचे संतुलात राखणे अत्यंत कठीण होऊ शकते. मात्र मार्च पासून आपले अच्छे दिन सुरु होण्याचे योग आहेत २२ एप्रिल नंतर मात्र गुरूच्या कृपेने तुम्हाला प्रचंड धनलाभ होऊ शकतो.

कर्क राशीच्या करिअरची दिशा बदलणार? (Career Of Cancer Zodiac In 2023)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीत यंदा शनीच्या ढैय्याचा प्रभाव सुरु होत आहेत. यामुळे आपल्या राशीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे आपल्याला परदेश वारीचे योग आहेत मात्र म्हणून तुम्हाला कुटुंबापासून लांब राहावे लागू शकते. २२ एप्रिलच्या आधी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे तरच उर्वरित २०२३ मध्ये आपल्याला मनाला हवी तशी प्रगती लाभू शकते.

हे ही वाचा<< ३० वर्षांनी शनिचा कुंभ राशीत प्रवेश, गुरुदेवही प्रसन्न! २०२३ मध्ये तुम्हीही होणार श्रीमंत? प्रेम व आरोग्य कसे असेल?

कर्क राशीला धनलाभ होणार का? (Finance Of Cancer Zodiac In 2023)

शनिची वक्रदृष्टी असूनही आपल्या राशीत धनलाभाचे योग आहेत. आपल्याला व्यवहार करताना थोडं सांभाळून राहण्याची गरज आहे. जर तुम्हाला विश्वास नसेल तर उधारी देण्याची चूक करू नका. शेअर बाजारात व लॉटरीमध्ये तुम्हाला नुकसान होऊ शकते पण जर तुम्ही नीट सल्ला घेऊन संपूर्ण व्यवहार केलात तर तुम्हाला यातून प्रचंड धनलाभ सुद्धा होऊ शकतो. जानेवारीच्या सुरुवातीला आपण घर व वाहन खरेदी करू शकता. यानंतर सप्टेंबर पर्यंत आपली आर्थिक स्थिती साधारण असेल पण पुन्हा सप्टेंबर ते डिसेंबर या काळात बोनस रूपात धनलाभ होऊ शकतो.

कर्क राशीच्या मंडळींचे आरोग्य (Health Of Cancer Zodiac In 2023)

२०२३ मध्ये आपल्याला आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. जानेवारी- फेब्रुवारीमध्ये सर्दी, ताप, पोटाचे विकार व ऍसिडिटी आपल्याला त्रास जाणवू शकतात. शनीचं प्रभावाने वर्षाचे उत्तरार्ध सुद्धा छोट्या मोठ्या आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. या संपूर्ण वर्षात आपल्याला आरोग्य जपायचे आहे व आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यायचे आहे.

कर्क राशीचे वैवाहिक जीवन (Married Life And Relationship Of Cancer Zodiac In 2023)

२०२३ वर्षात तुमच्या समस्यांमध्ये तुमचा जोडीदार तुम्हाला आराम देण्याचे काम करू शकतो. जेव्हा आपल्या राशीत शनिदेव प्रभाव सुरु करतील तेव्हा तुम्हाला प्रेम संबंधात कटुता जाणवू शकते पण जर का तुमचा जोडीदार मिथुन, मीन किंवा सिंह राशीचा असेल तर ते तुम्हाला नक्कीच समजून घेऊ शकतील. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.

हे ही वाचा<< वृषभ राशीसाठी २०२३ वर्ष कसे असणार? शनिदेवाच्या कृपेने होऊ शकता श्रीमंत, प्रेम व आरोग्य कसे राहणार?

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader